अमळनेरात अनधिकृत गौण खनिज वाहतूक करणारा डंपर पकडला प्रांताधिकारी मयुर भंगाळे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागाची कारवाई.

0

अमळनेर/आबिद शेख


अमळनेर : प्रांताधिकारी मयुर भंगाळे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागाच्या पथकाने अमळनेर शहरातील भगवा चौक येथे अनधिकृतरीत्या गौण खनिज मुरूमाची वाहतूक करणारा डंपर पकडला. संबंधित डंपर ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी अमळनेर तहसील कार्यालयात जमा करण्यात आला आहे.


भगवा चौक परिसरात तपासणीदरम्यान सदर डंपर अनधिकृत गौण खनिज मुरूमाची वाहतूक करताना आढळून आला. त्यानंतर महसूल पथकाने तत्काळ कारवाई करत डंपर ताब्यात घेतला.
या कारवाईत नायब तहसीलदार सी. यू. पाटील, मंडळ अधिकारी पी. एस. पाटील (वावडे भाग), ग्राम महसूल अधिकारी संदीप माळी (मांडळ), बिक्रम कदम (शहापूर), अमोल पाटील (कुरे खुर्द), विकेश भोई (बाम्हणे) आणि एम. आर. पाटील (जैतपीर) यांचा सहभाग होता.


अनधिकृत गौण खनिज उत्खनन व वाहतुकीविरोधात महसूल विभागाकडून कारवाई सुरू असून, अशा प्रकारे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Oplus_131072

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed