ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त १५१ वृक्ष लागवडीचा संकल्प; अल खिदमत ट्रस्ट व जयनिल फाऊंडेशनचा संयुक्त पुढाकार.

0

अमळनेर/आबिद शेख 


अमळनेर : ईद-ए-मिलादुन्नबी स.अ.च्या पवित्र पर्वाचे औचित्य साधून पर्यावरण संवर्धनासह विविध सामाजिक व विधायक उपक्रम राबविण्याचा निर्णय अल खिदमत ट्रस्ट, अमळनेर आणि जयनिल फाऊंडेशन यांच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला. आमदार कार्यालयात काल सायंकाळी ही बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.


बैठकीस जयनिल फाऊंडेशनचे अध्यक्ष गौतम अनिल पाटील तसेच फाऊंडेशनचे सदस्य उपस्थित होते. यावेळी अल खिदमत ट्रस्ट, अमळनेरच्या सदस्यांच्या वतीने गौतम पाटील यांचा सत्कार करण्यात आला.


ईद-ए-मिलादुन्नबी स.अ.च्या निमित्ताने पर्यावरण रक्षणाचा संदेश देत १५१ झाडे लावण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. वृक्षलागवडीच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाबरोबरच नागरिकांमध्ये हरित चळवळीबाबत जनजागृती करण्याचा मानस व्यक्त करण्यात आला.
याशिवाय समाजोपयोगी आणि गरजूंसाठी उपयुक्त ठरणारे अनेक विधायक उपक्रम भविष्यात अल खिदमत ट्रस्ट आणि जयनिल फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने राबविण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. सामाजिक एकोपा, पर्यावरण संवर्धन, गरजूंची मदत आणि समाजहिताच्या विविध कार्यांना चालना देण्यावर यावेळी चर्चा करण्यात आली.
दोन्ही संस्थांच्या सदस्यांनी एकत्रितपणे समाजाच्या विकासासाठी आणि मानवतेच्या सेवेसाठी कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. बैठकीस अल खिदमत ट्रस्ट, अमळनेरचे सर्व सदस्य तसेच जयनिल फाऊंडेशनचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
ईद-ए-मिलादुन्नबीच्या निमित्ताने १५१ वृक्षलागवडीच्या या उपक्रमातून ‘पर्यावरणाचे रक्षण आणि मानवतेची सेवा’ हा सकारात्मक संदेश समाजापर्यंत पोहोचणार असून, आगामी काळातही दोन्ही संस्थांकडून विविध सामाजिक उपक्रम राबविले जाणार आहेत.

Oplus_131072

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed