प्रताप महाविद्यालयाचे माजी प्राचार्य प्रा. डॉ. अरविंद सराफ यांचे निधन.
अमळनेर/आबिद शेख

अमळनेर : येथील प्रताप महाविद्यालयाचे माजी प्राचार्य तसेच सानेगुरुजी कर्मभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष प्रा. डॉ. अरविंद गोपाळदास सराफ (वय ८९) यांचे सोमवार, दि. १८ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजता वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.

प्रा. डॉ. सराफ यांनी शैक्षणिक, सामाजिक व धार्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले होते. ते श्री मंगळदेव मंदिर मंडळाचे संस्थापक, श्री सोनार व सराफ असोसिएशनचे अमळनेरचे माजी अध्यक्ष तसेच अमळनेर सिनियर सिटीझन क्लबचे संस्थापक अध्यक्ष होते.
त्यांच्या निधनाने अमळनेरच्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांची अंत्ययात्रा बुधवार, दि. १९ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता न्यू प्लॉट येथील शिवाजी महाराज उद्यानासमोरील त्यांच्या राहत्या घरापासून निघणार आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आहे. इंजि. मिलिंद सराफ यांचे ते वडील तर डॉ. संदीप सराफ यांचे काका होत.

