रस्त्यातच आदिवासी महिलेची प्रसूती; नागरिकांच्या तत्परतेने माता-बाळ सुखरूप.
अमळनेर/आबिद शेख

अमळनेर : प्रसूतीसाठी पॅजो रिक्षातून अमळनेरकडे येत असलेल्या आदिवासी महिलेची तांबेपुरा परिसरात रिक्षातच प्रसूती झाल्याची घटना मंगळवारी, दि. १८ ऑगस्ट रोजी सायंकाळी सव्वा सात वाजेच्या सुमारास घडली. नागरिक आणि आरोग्य विभागाच्या तत्परतेमुळे माता व नवजात बाळ दोघेही सुखरूप राहिले.

अंतुर्ली येथील शेतमजूर संगीता पावरा यांना प्रसूतीच्या कळा सुरू झाल्याने त्या पतीसह पॅजो रिक्षाने अमळनेरकडे येत होत्या. नंदगाव रस्त्यावरील तांबेपुरा परिसरात पोहोचताच त्यांना रिक्षातच प्रसूती होऊ लागली.
ही बाब लक्षात येताच नगरसेविका अफसाना खाटीक, अंतुर्ली-रंजाणेचे सरपंच सचिन पाटील, माजी नगरसेवक मुख्तार खाटीक, माजी नगरसेवक बाळा पवार यांच्यासह परिसरातील महिलांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. प्रकाश ताळे यांना घटनेची माहिती देण्यात आली.

डॉ. ताळे यांनी विलंब न करता रुग्णवाहिका तसेच डॉ. अवैस शेख
ड्रायव्हर नितीन बिरारी (१०८) ambulance अमळनेर RH कुलकर्णी मॅडम नर्स योगिता कुलकर्णी यांना घटनास्थळी पाठविले. आवश्यक मदत मिळाल्यानंतर महिलेची सुखरूप प्रसूती करण्यात आली. त्यानंतर माता व बाळाला पुढील उपचारासाठी अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोघांचीही प्रकृती सुखरूप असल्याचे सांगण्यात आले.

