SIRच्या वाढत्या कामाच्या ताणाविरोधात अमळनेर तालुका BLO न्याय हक्क समिती आक्रमक घरगणनेचे काम BLOकडून करून घेऊ नये; योग्य मानधन, वाढीव वेतनवाढ व अर्जित रजेची मागणी.

0

 अमळनेर/आबिद शेख
अमळनेर : SIRच्या कामाचा वाढता ताण, वारंवार दिले जाणारे आदेश आणि अतिरिक्त कामाचा भार यामुळे त्रस्त असलेल्या अमळनेर तालुका BLO न्याय हक्क समितीच्या वतीने सोमवार, दि. १७ ऑगस्ट रोजी प्रांताधिकारी मयूर भंगाळे यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी तालुक्यातील शेकडो BLO शिक्षकांच्या स्वाक्षऱ्या असलेले निवेदन प्रशासनाकडे सादर करण्यात आले.


निवेदनात BLO यांच्याकडून घरगणनेचे काम करून घेण्यास स्पष्ट विरोध करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी, जळगाव यांच्या दि. १४ ऑगस्ट २०२६ रोजीच्या पत्रात घरगणनेचे काम BLO यांनी करावे, असा स्पष्ट उल्लेख नसल्याचे समितीने नमूद केले. तसेच SIRच्या अधिकृत वेळापत्रकातही घरगणनेच्या कामाचा उल्लेख नसताना पर्यवेक्षकीय यंत्रणेकडून BLO यांच्यावर हे काम सोपविण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करण्यात आला. त्यामुळे घरगणनेचे काम BLO यांच्याकडून करून घेऊ नये, अशी प्रमुख मागणी निवेदनातून करण्यात आली.


BLO यांनाही योग्य मानधन द्यावे
भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार ERO व AERO यांना अनुक्रमे ३० हजार व २५ हजार रुपये मानधन मंजूर करण्यात आले आहे. त्याच धर्तीवर निवडणूक प्रक्रियेत प्रत्यक्ष काम करणाऱ्या BLO यांनाही त्यांच्या जबाबदारी व कामाच्या स्वरूपानुसार योग्य मानधन मंजूर करण्यात यावे, अशी मागणी समितीने केली.
अवेळी आदेश व कारवाईच्या धमक्या थांबविण्याची मागणी
वरिष्ठ स्तरावरून वारंवार तसेच अवेळी दिले जाणारे आदेश केवळ कार्यालयीन वेळेत आणि लेखी स्वरूपातच देण्यात यावेत, अशी मागणीही करण्यात आली. तसेच कामाच्या अनुषंगाने BLO यांना वारंवार कारवाईच्या धमक्या देण्याचे प्रकार थांबवावेत, अशी अपेक्षा निवेदनात व्यक्त करण्यात आली.
वाढीव वेतनवाढ आणि अर्जित रजेची मागणी
निवडणूक कामाचा अतिरिक्त भार लक्षात घेता BLO शिक्षकांना एक वाढीव वेतनवाढ देण्यात यावी. तसेच कामाचे स्वरूप व प्रमाण लक्षात घेऊन जनगणनेच्या धर्तीवर अर्जित रजा मंजूर करण्यात यावी, अशी मागणी समितीने केली आहे.
BLO यांच्या विविध मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून आपल्या स्तरावरील मागण्या तातडीने मान्य कराव्यात आणि वरिष्ठ स्तरावरील मागण्यांसाठी शासनाकडे योग्य तो पाठपुरावा करावा, अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली.
यावेळी प्रांताधिकारी मयूर भंगाळे यांनी BLO यांच्या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून वरिष्ठ पातळीवर योग्य तो पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार प्रशांत धमके उपस्थित होते.
निवेदनावर भगवान एकनाथ पाटील, राजेंद्र गुलाबराव चौधरी, शाम भालेराव वाघ, अजय भगवान भामरे, दिनेश विक्रम शिरसाठ, भूषण सुरेश महाले, सुरेश बाबुराव वाडीले, जितेंद्र जिजाबराव पाटील, नामदेव संतोष अहिरे, रवींद्र त्र्यंबक महाजन, आशिष धरमसिंग राजपूत, प्रसाद प्रभाकर जोशी, रियाज अहमद शेख, रामेश्वर तुकाराम भदाणे, ज्ञानेश्वर तुकाराम गांधलीकर, राजेंद्र दयाराम पारील, मकरंद रमेश निळे, उज्वल अशोक मार्कंडेय, अतुल राजाराम भोई, किरण सुरेश ठाकर, अजय वि. बोरसे, चंद्रकांत भिला पाटील, विशाल संजय साळुंखे, गोविंदा बळीराम माळी, डॉ. कुणाल मुरलीधर पवार, गिरीश युवराज पाटील, गणेश शामराव चव्हाण, प्रदीप नाना सैंदाणे, प्रफुल्ल शरद भदाणे, सुषमा नारायण तायडे, कविता पाटील, मनिषा बन्सीलाल पाटील, विकास सुंदरलाल चौधरी, जगदिश शिवाजी पाटील, सुधीर शांताराम चौधरी, हर्षल सतिबराव सोनवणे, संजीव विठ्ठल पाटील, प्रेमराज पवार, सागर आधार महाजन, ज्ञानेश्वर छबिलाल भदाणे, राहूल चैतन्य महाजन, राहुल राजेंद्र पाटील, भटेश्वर नानाभाऊ भदाणे, भरत रामदास पाटील, जयेश हेमलाल लोहार, नरेश यशवंत पाटील, प्रशांत विजयराव कापडणे, सुधीर अनिक पाटील, भुपेंद्र बळीराम वानखडे, गुलाब सकाराम बोरसे, सुमेध मनोहर मोहिते, महेंद्र अर्जुन रत्नपारखी, चिंतामण हेमराज धनके, धिरज रतिलाल कोठवाल, प्रदीप सुखदेव पाटील, कैलास रामधर बाविस्कर, जितेंद्र वसंत वाणी, विनित सुधाकर कुळकर्णी, राहुल भानुदास देसले, अजय मोतीलाल महाजन, म. आसिम अ. नईम, विनोद गुलबराव भदाणे, दिनेश सुरेश कार्लेकर, विकास गोपीचंद पाटील, जयवंत भीमराव पाटील, ज्ञानेश्वर बापू मोरे, आर. आर. पाटील, नंदलाल हिंमतराव पाटील, अरविंद मुकुंदराव भामरे, विनोद गुलाबराव पाटील, महेश धर्मा बोरसे यांच्यासह तालुक्यातील शेकडो BLO शिक्षकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
SIRच्या कामाचा वाढता व्याप आणि त्यासोबत सोपविण्यात येणाऱ्या अतिरिक्त जबाबदाऱ्यांमुळे BLO वर्गात नाराजी वाढत असून, प्रशासन या मागण्यांवर कोणती भूमिका घेते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed