रवि ज्वेलर्समध्ये सोन्याच्या दागिन्यांचे भव्य कलेक्शन; २२ कॅरेट दागिन्यांच्या खरेदीवर आकर्षक भेटवस्तू! अत्याधुनिक डिझाइन्ससह पारंपरिक दागिन्यांची मोठी व्हरायटी उपलब्ध; कॅरेटोमीटरद्वारे सोन्याची तपासणी आणि मोफत ज्वेलरी इन्शुरन्सची सुविधाही.
अमळनेर/आबिद शेख 
अमळनेर : शहरातील सराफ बाजारात असलेल्या रवि ज्वेलर्समध्ये ग्राहकांसाठी सोन्याच्या दागिन्यांचे आकर्षक आणि नवनवीन कलेक्शन उपलब्ध झाले आहे. लग्नसराई, सण-समारंभ तसेच विविध शुभप्रसंगी सोन्याचे दागिने खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी येथे पारंपरिक आणि आधुनिक डिझाइन्सची मोठी व्हरायटी पाहायला मिळत आहे.
रवि ज्वेलर्समध्ये आकर्षक मंगळसूत्र, नेकलेस, राणीहार, कानातले, बांगड्या यांसह विविध प्रकारचे दागिने उपलब्ध आहेत. महाराष्ट्रीय पारंपरिक दागिन्यांपासून ते आधुनिक फॅशनला साजेशा डिझाइन्सपर्यंत प्रत्येक वयोगटातील ग्राहकांच्या आवडीनुसार दागिन्यांची निवड येथे करता येणार आहे.

विशेष म्हणजे, रवि ज्वेलर्सकडून ग्राहकांसाठी खरेदीसोबत खास भेटवस्तूची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रत्येक २२ कॅरेट सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर ग्राहकांना आकर्षक भेटवस्तू दिली जाणार आहे. त्यामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीसोबत भेटवस्तूचा आनंदही ग्राहकांना घेता येणार आहे.
ग्राहकांचा विश्वास आणि सोन्याची शुद्धता जपण्यासाठी रवि ज्वेलर्समध्ये कॅरेटोमीटरद्वारे सोन्याची तपासणी करण्याची सुविधा उपलब्ध आहे. तसेच ग्राहकांच्या दागिन्यांसाठी मोफत ज्वेलरी इन्शुरन्सची सुविधाही देण्यात येत आहे.
सन १९९४ पासून विश्वासाची परंपरा जपणाऱ्या रवि ज्वेलर्सने ग्राहकांच्या समाधानाला नेहमीच प्राधान्य दिले आहे. आकर्षक डिझाइन्स, दर्जेदार दागिने आणि ग्राहकाभिमुख सेवा यामुळे ग्राहकांना खरेदीचा उत्तम अनुभव मिळत आहे.
तरी अमळनेरकरांनी आपल्या परिवारासह रवि ज्वेलर्सला भेट देऊन सोन्याच्या दागिन्यांच्या भव्य कलेक्शनचा लाभ घ्यावा आणि २२ कॅरेट दागिन्यांच्या खरेदीवर आकर्षक भेटवस्तू मिळवण्याची संधी साधावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
रवि ज्वेलर्स, सराफ बाजार, अमळनेर. संपर्क : ७०७४७४२१२१
विश्वासाची परंपरा… दागिन्यांची नवी दुनिया!

