शिरपूरात आर. सी. पटेल उर्दू शाळांमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात.

0

24 प्राईम न्यूज 16 Aug 2026


शिरपूर : आर. सी. पटेल उर्दू माध्यमिक विद्यालय आणि आर. सी. पटेल उर्दू प्राथमिक शाळेच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते सैय्यद झाकीर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगर परिषद शिरपूरच्या शिक्षण मंडळाचे माजी सभापती जाकीर शेख होते. त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत, देशभक्तीपर गीते तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
यावेळी आर. सी. पटेल उर्दू माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक डॉ. मुबिनोद्दीन शेख आणि आर. सी. पटेल उर्दू प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक डॉ. सैय्यद इफ्तेखार अहमद यांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व, देशभक्ती, राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक जबाबदारी याबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुरेशी शेख सादिक आणि कुरैशी फिरोज यांनी प्रभावीपणे केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमास शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उत्साहपूर्ण व देशभक्तीमय वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed