अमळनेर पोलिसांचा क्रिकेट चषकावर कब्जा; समाधान गायकवाड ‘मॅन ऑफ द सिरीज’सह सर्वोत्कृष्ट फलंदाज.

0

अमळनेर/आबिद शेख 

अमळनेर : स्वातंत्र्य दिनानिमित्त जयनील फाउंडेशन तसेच परिवर्तन क्रिकेट क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट चषक स्पर्धेत अमळनेर पोलीस क्रिकेट संघाने दमदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले. या स्पर्धेत एकूण आठ संघांनी सहभाग घेतला होता.


स्पर्धेतील अंतिम सामन्यात अमळनेर पोलीस क्रिकेट संघाने उत्कृष्ट प्रदर्शन करत विजय मिळवला आणि चषकावर आपले नाव कोरले. संपूर्ण स्पर्धेत पोलिस संघाच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली.
पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड यांनी स्पर्धेत आक्रमक फलंदाजीचे दर्शन घडवत ‘मॅन ऑफ द सिरीज’ तसेच ‘बेस्ट बॅट्समन’ पुरस्कार पटकावला. एका सामन्यात त्यांनी अवघ्या ३४ चेंडूत तब्बल १८ षटकारांच्या सहाय्याने १३४ धावांची तुफानी खेळी केली.


दरम्यान, स्पर्धेत पत्रकार संघ आणि वकील संघ यांच्यात झालेला सामना चांगलाच रंगला. शेवटच्या षटकापर्यंत दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. अखेर वकील संघाने पत्रकार संघाचा १३ धावांनी पराभव करत विजय मिळवला.
स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित या क्रिकेट स्पर्धेमुळे क्रीडाप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. स्पर्धेत सहभागी सर्व संघांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत स्पर्धेची रंगत वाढवली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed