शिरपूर मुस्लिम एज्युकेशन ट्रस्टतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक सेमिनारातून करिअर मार्गदर्शन.

0

24 प्राईम न्यूज 16 Aug 2026

शिरपूर : स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून शिरपूर मुस्लिम एज्युकेशन ट्रस्टच्या वतीने मुस्लिम समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या प्रोत्साहनासाठी स्वातंत्र्य दिन, एज्युकेशनल सेमिनार आणि बक्षीस वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले. ट्रस्टचे अध्यक्ष हाजी सय्यद जाकीर सय्यद नूर यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन समितीच्या सदस्यांनी या कार्यक्रमाचे नियोजन करून तो यशस्वीपणे पार पाडला. देशभक्ती, शिक्षणाचे महत्त्व आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचा संदेश देणारा हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात झाला.


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री अमरीशभाई पटेल होते. प्रमुख उपस्थितांमध्ये शिरपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशिराम वेचन पावरा, एस.व्ही.के.एम. कॅम्पसचे को-चेअरमन व माजी नगराध्यक्ष भुपेशभाई रसिकलाल पटेल, लोकनियुक्त नगराध्यक्ष चिंतनभाई अमरीशभाई पटेल, मुस्लिम सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष फिरोज मासुलदार, शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष राजगोपाल चंदुलाल भंडारी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. तुषारजी व्ही. रंधे, माजी जि.प. उपाध्यक्ष देवेंद्र जयराम पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन के.डी. पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपनगराध्यक्षा संगीताताई राजेंद्र देवरे, भाजपा जिल्हाध्यक्ष बबन रावजी चौधरी, शिरपूरचे पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी, माजी अभियंता व नगरसेवक माधवराव पाटील, विवि फातेमा गर्ल्स स्कूलचे चेअरमन अ. रज्जाक बिस्मिल्ला कुरेशी, माजी सभापती शिक्षण मंडळ जाकीरअहमद शेख नजीर, बैतुल माल कमेटीचे अध्यक्ष हमीदखां अलियारखां पठाण, प्रांताधिकारी शरद मंडलिक, डीवायएसपी सुधीर पाटील, तहसीलदार महेंद्र माळी, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, शिक्षण समिती सभापती शामकांत जगन्नाथ ईशी, नगरसेवक राजेंद्र जगदिश अग्रवाल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
नगरसेवक इरफान मुशिर मिर्झा, नगरसेविका रेहानाबी सलीम पटवे, नगरसेविका उजमाबी इरफान कुरेशी, नगरसेवक आवेश शेख महेमुद यांचीही उपस्थिती लाभली. आर.सी. पटेल उर्दू हायस्कूलचे प्राचार्य डॉ. हाजी मुबीन शेख, विविध शैक्षणिक संस्थांचे शिक्षक व प्राचार्य, सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक आणि समाजातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरलेल्या बक्षीस वितरण समारंभात विविध शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांना त्यांच्या यशाबद्दल शुभेच्छा देत पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी प्रोत्साहन देण्यात आले.
शिक्षण हे समाजाच्या प्रगतीचे प्रमुख साधन असून विद्यार्थ्यांनी मेहनत, सातत्य आणि जिद्दीच्या बळावर उच्च शिक्षण घेऊन समाज व देशाच्या विकासात योगदान द्यावे, असा संदेश मान्यवरांनी दिला.
एज्युकेशनल सेमिनारमधून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
एज्युकेशनल सेमिनारमध्ये विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण, स्पर्धा परीक्षा, करिअरच्या विविध संधी तसेच शैक्षणिक प्रगतीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. बदलत्या काळानुसार विद्यार्थ्यांनी पारंपरिक शिक्षणासोबत आधुनिक तंत्रज्ञान, कौशल्याधारित शिक्षण आणि विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांकडेही लक्ष द्यावे, असे आवाहन करण्यात आले.
विविध संस्थांचे सहकार्य
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी मुस्लिम सेवा संघ, शिरपूर, इलाही फाऊंडेशन, शिरपूर आणि लब्बैक फाऊंडेशन, शिरपूर यांचे सहकार्य लाभले. तसेच मोहंमदिया चौक यंग सर्कल, शहीद अ. हमीद यंग सर्कल, बागवान यंग सर्कल, इंडियन बॉईज आणि आझाद हिंद ग्रुप, शिरपूर यांनीही सहकार्य केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अध्यक्ष हाजी सय्यद जाकीर सय्यद नूर, उपाध्यक्ष आबीद ईसा मंसुरी, सचिव डॉ. शकील सलीम खान, खजिनदार आरीफ शेख रहेमान तसेच नियोजन समितीतील जाकीर बिस्मिल्ला बागवान, साजीद शेख रसुल (शेखा), सै. आरीफ सै. ईस्माईल, हाजी नासीर सै. वजीर, शहेबाजबेग जुम्माबेग मिर्झा, अशफाक अ. सत्तार तेली आणि इद्रीस नुरोद्दीन चौधरी यांच्यासह सदस्यांनी परिश्रम घेतले.
विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे, शिक्षणाची गोडी वाढविणे आणि गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे या उद्देशाने आयोजित केलेला हा उपक्रम समाजात शिक्षणाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण करणारा ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed