तिरंगा बॅचच्या माध्यमातून रवि ज्वेलर्सचा देशभक्तीचा अनोखा संदेश स्वातंत्र्य दिनानिमित्त ग्राहकांना तिरंगा बॅचचे वाटप; उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद.
अमळनेर/आबिद शेख.

अमळनेर : स्वातंत्र्य दिनाच्या पावन पर्वानिमित्त रवि ज्वेलर्स, अमळनेर यांच्या वतीने देशभक्तीपर विशेष उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत रवि ज्वेलर्सच्या दुकानात येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला तिरंगा बॅचचे वाटप करण्यात आले.
देशाच्या स्वातंत्र्याचा उत्सव हा प्रत्येक भारतीयाच्या मनात अभिमान, राष्ट्रप्रेम आणि देशभक्तीची भावना निर्माण करणारा असतो. याच भावनेतून रवि ज्वेलर्सने हा उपक्रम आयोजित केला. ग्राहकांनीही तिरंगा बॅच मोठ्या उत्साहाने स्वीकारत या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

तिरंगा हा केवळ भारताचा राष्ट्रीय ध्वज नसून तो देशाचे शौर्य, शांतता, समृद्धी आणि एकतेचे प्रतीक आहे. प्रत्येक नागरिकाच्या मनात राष्ट्रप्रेमाची भावना अधिक दृढ व्हावी आणि स्वातंत्र्य दिनाचा संदेश प्रत्येकापर्यंत पोहोचावा, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता.
स्वातंत्र्यसैनिकांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी केलेला त्याग आणि बलिदान यांची आठवण ठेवत, देशाच्या प्रगतीसाठी प्रत्येक नागरिकाने आपापल्या परीने योगदान द्यावे, असा संदेशही या उपक्रमातून देण्यात आला. ‘तिरंगा आपल्या हृदयात, देशप्रेम आपल्या कृतीत’ या भावनेने रवि ज्वेलर्सने हा उपक्रम उत्साहात राबविला.
ग्राहकांशी असलेले जिव्हाळ्याचे नाते जपत सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा हा एक छोटासा प्रयत्न असल्याचे रवि ज्वेलर्सच्या वतीने रवि वर्मा आणि निखील वर्मा यांनी सांगितले. व्यावसायिक क्षेत्रासोबतच सामाजिक आणि राष्ट्रहिताच्या उपक्रमांमध्येही सहभागी होण्याचा रवि ज्वेलर्सचा प्रयत्न असल्याचे त्यांनी नमूद केले.
स्वातंत्र्य दिनानिमित्त रवि ज्वेलर्सच्या या उपक्रमाचे ग्राहकांकडून कौतुक करण्यात आले. तिरंगा बॅच परिधान करून ग्राहकांनीही देशप्रेमाची भावना व्यक्त केली.
रवि ज्वेलर्स, अमळनेर यांच्या वतीने संपूर्ण अमळनेरवासीयांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

