‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत नवीन मराठी शाळेची भव्य तिरंगा रॅली.
अमळनेर/ आबिद शेख

अमळनेर : स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून नवीन मराठी शाळेच्या वतीने ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीत इयत्ता पहिली ते चौथीचे विद्यार्थी, शिक्षक तसेच पालक मोठ्या संख्येने सहभागी झाले.

सकाळी ठीक ८ वाजता शाळेच्या मुख्याध्यापकांच्या हस्ते राष्ट्रध्वजाचे पूजन करून रॅलीला सुरुवात झाली. विद्यार्थ्यांनी हातात तिरंगा ध्वज तसेच देशभक्तीपर संदेशांचे फलक घेतले होते. ‘वंदे मातरम्’, ‘भारत माता की जय’ अशा घोषणांनी संपूर्ण परिसर देशभक्तीच्या वातावरणाने भारून गेला.
राष्ट्रध्वजाविषयी नागरिकांमध्ये आदराची भावना निर्माण करणे आणि प्रत्येक घरावर तिरंगा फडकविण्याचा संदेश पोहोचविणे हा रॅलीचा मुख्य उद्देश होता. रॅलीने अमळनेर शहरातील वड चौक, बडगुजर मंगल कार्यालय मार्गे मुख्य बाजारपेठेतून मार्गक्रमण केले. यावेळी नागरिकांनीही रॅलीचे उत्स्फूर्त स्वागत केले.

रॅलीचा समारोप शाळेच्या मैदानावर करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. शाळेने राबविलेल्या या देशभक्तीपर उपक्रमाचे पालक व नागरिकांनी विशेष कौतुक केले.

