स्वातंत्र्यदिनाच्या पर्वावर अमळनेरात रंगणार ‘इंडिपेंडन्स कप’ क्रिकेटचा थरार जयनील फाउंडेशनच्या क्रीडा विभागातर्फे प्रोफेशनल क्रिकेट लीगचे आयोजन; विविध क्षेत्रांतील ८ संघांचा सहभाग.

0

अमळनेर/आबिद शेख 


अमळनेर : स्वातंत्र्यदिनाच्या पावन पर्वानिमित्त देशभक्ती, क्रीडाभावना आणि संघभावनेचा अनोखा संगम घडवून आणण्यासाठी जयनील फाउंडेशनच्या क्रीडा विभागातर्फे प्रोफेशनल क्रिकेट लीग – ‘इंडिपेंडन्स कप २०२६’ या भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत अमळनेर शहरातील विविध क्षेत्रांतील तब्बल ८ संघांनी सहभाग घेतला असून, क्रिकेटप्रेमींना स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी रोमांचक सामन्यांचा थरार अनुभवता येणार आहे.


ही स्पर्धा शनिवार, १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९ वाजता तालुका क्रीडा संकुल, मारवड रोड, अमळनेर येथे होणार आहे. विविध क्षेत्रांतील मान्यवर, कर्मचारी, खेळाडू आणि नागरिकांचा सहभाग असल्याने या स्पर्धेकडे शहराचे लक्ष लागले आहे.
या संघांचा सहभाग
‘इंडिपेंडन्स कप २०२६’ मध्ये पुढील संघ सहभागी झाले आहेत :
अमळनेर वकील संघ
अमळनेर पत्रकार संघ
अमळनेर पोलीस संघ
अमळनेर नगरपालिका संघ
अमळनेर मेडिकल संघ
अमळनेर पॅथॉलॉजी संघ
परिवर्तन क्रिकेट क्लब – १
परिवर्तन क्रिकेट क्लब – २
विविध क्षेत्रांतील हे संघ एकाच मैदानावर उतरणार असल्याने स्पर्धेत चुरस आणि उत्साह पाहायला मिळणार आहे. विशेषतः वकील, पत्रकार, पोलीस, नगरपालिका, मेडिकल, पॅथॉलॉजी आणि क्रिकेट क्लब यांच्या संघांमधील सामने क्रिकेटप्रेमींसाठी आकर्षणाचे ठरणार आहेत.
स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या क्रीडा महोत्सवाचा उद्देश केवळ क्रिकेट स्पर्धा घेणे नसून ‘खेळातून एकता, क्रीडेतून प्रगती आणि देशभक्तीतून प्रेरणा’ हा संदेश समाजापर्यंत पोहोचवणे हा आहे.
क्रिकेटप्रेमी तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहभागी खेळाडूंचा उत्साह वाढवावा आणि ‘इंडिपेंडन्स कप २०२६’ या क्रीडा महोत्सवाची शोभा वाढवावी, असे आवाहन जयनील फाउंडेशनचे क्रीडा विभाग प्रमुख वेद राजेश पाटील यांनी केले आहे.

Oplus_131072

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed