अमळनेरमध्ये पूरग्रस्तांना १४ ऑगस्टला किराणा किटचे वाटप; शहरातील ८ केंद्रांवर मदत वितरण.

0

अमळनेर/आबिद शेख 


अमळनेर : तालुक्यात ३१ जुलै २०२६ रोजी झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. अमळनेर नगरपरिषद हद्दीतील नैसर्गिक आपत्तीग्रस्त नागरिकांना जीवनावश्यक वस्तू व किराणा किटचे वाटप शुक्रवार, १४ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० वाजेपासून करण्यात येणार आहे.


याबाबत तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी, अमळनेर यांच्या कार्यालयाकडून सविस्तर आदेश जारी करण्यात आले असून, मदत वाटपासाठी विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
शहरातील ८ केंद्रांवर होणार वाटप
पूर व अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या नागरिकांना मदत मिळणे सुलभ व्हावे यासाठी शहरातील आठ ठिकाणी वाटप केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत.
भोई समाज मंगल कार्यालय, पैलाड
शहरी आरोग्यवर्धिनी केंद्र, ताडेपुरा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह, गांधलीपुरा
संत सखाराम महाराज वाडी
शिवाजी विद्या मंदिर, तांबेपुरा
क्षत्रिय कांचमाळी पंचमढी, बहादरपूर नाका रोड
शिवम कुटी बोर्डाजवळ, झामी चौक
विद्या विहार कॉलनी गेटजवळ
एका कुटुंबाला एक किराणा किट
प्रति बाधित कुटुंबास एक किराणा किट देण्यात येणार आहे. मदत मिळवण्यासाठी संबंधित नागरिकांनी स्वतःची किंवा कुटुंबातील सदस्याची ओळख पटवणे आवश्यक राहणार आहे.


वाटप प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी लाभार्थ्याचा फोटो घेण्यात येणार असून, मदत प्राप्त केल्याबाबत लाभार्थ्याची स्वाक्षरीही घेण्यात येणार आहे.
दरम्यान, सर्व संबंधित बाधित नागरिकांनी निर्धारित केंद्रावर वेळेत उपस्थित राहून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Oplus_131072

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed