अमळनेर पोलिसांची कारवाई; चोरीची मोटारसायकल जप्त, संशयिताला अटक.
अमळनेर/आबिद शेख

अमळनेर : अमळनेर शहरातील श्रीराम कॉलनी, शिरूड नाका परिसरातून चोरीस गेलेली हिरो होंडा सीडी डीलक्स मोटारसायकल अमळनेर पोलिसांनी तपासादरम्यान जप्त करून गुन्हा उघडकीस आणला आहे. या प्रकरणी विनायक उखा पाटील (रा. वेळोदे, ता. चोपडा, जि. जळगाव) याला अटक करण्यात आली आहे.
फिर्यादी हरेश गंभीर चौधरी (रा. श्रीराम कॉलनी, शिरूड नाका, अमळनेर) यांची अंदाजे २५ हजार रुपये किमतीची हिरो होंडा सीडी डीलक्स मोटारसायकल क्रमांक एमएच १९ ए.क्यू. २१६२ अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती. याबाबत अमळनेर पोलिस ठाण्यात गु.र.नं. ४१२/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये ७ ऑगस्ट २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना विनायक उखा पाटील हा चोरीची मोटारसायकल विक्री करण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पथक तयार करून संशयिताचा शोध घेतला. पथकाने विनायक पाटील याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याच्याकडून फिर्यादीची चोरीस गेलेली मोटारसायकल तसेच आणखी एक मोटारसायकल जप्त करण्यात आली.
ही कारवाई पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते व उपविभागीय पोलिस अधिकारी विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक शरद काकळीज, पोलीस हवालदार प्रमोद पाटील, पोलीस अंमलदार नरेश बडगुजर, नितीन मनोरे व उज्वल पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.
चोरीची मोटारसायकल जप्त करून संशयिताला अटक करण्यात आल्याने सदर गुन्हा उघडकीस आला आहे.

