अमळनेरमध्ये १६ नोव्हेंबरला तालुकास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन प्रलंबित शासकीय कामे आणि नागरिकांच्या तक्रारी मांडण्याची संधी; तहसील कार्यालयात सकाळी ११ वाजता कार्यक्रम.

0

अमळनेर/आबिद शेख 

अमळनेर  : नागरिकांच्या विविध शासकीय तसेच नागरी समस्यांचे निराकरण करण्यासाठी अमळनेर तहसील कार्यालयात सोमवार, दि. १६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता तालुकास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबत तहसीलदार कार्यालयामार्फत माहिती देण्यात आली आहे.

या उपक्रमांतर्गत नागरिकांना आपल्या प्रलंबित कामांसह विविध समस्यांबाबत लेखी स्वरूपात अर्ज व तक्रारी सादर करता येणार आहेत. महसूल विभागातील प्रश्न, रेशनकार्ड, जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, जमीनविषयक वाद, पाणीपुरवठा, रस्त्यांच्या समस्या तसेच शासकीय योजनांचा लाभ घेताना येणाऱ्या अडचणी याबाबत नागरिकांना थेट प्रशासनाकडे आपली तक्रार मांडता येणार आहे.

शासकीय कार्यालयांमध्ये प्रलंबित असलेल्या कामांचा पाठपुरावा करण्यासाठी आणि नागरिकांच्या समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी लोकशाही दिन हे महत्त्वाचे व्यासपीठ आहे. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह लेखी अर्ज सादर करून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed