अमळनेरमध्ये १३ ऑगस्टला सुरांची बरसात; ‘स्वर-अर्पण’मधून संगीत दिग्गजांना श्रद्धांजली🎶

0

अमळनेर/आबिद शेख 

अमळनेर : पावसाच्या परिस्थितीमुळे ३१ जुलै २०२६ रोजी नियोजित करण्यात आलेला ‘स्वर. ओमकार म्युझिकल ऑर्केस्ट्रा, मुंबई’ प्रस्तुत ‘स्वर-अर्पण’ हा हिंदी व मराठी सुमधुर गीतांचा श्रद्धांजलीपर कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता. रसिकांच्या प्रेम आणि आग्रहास्तव आता ही सुरांची मैफल पुन्हा एकदा अमळनेरकरांच्या भेटीला येणार आहे.

गुरुवार, दि. १३ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर, अमळनेर येथे या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाच्या माध्यमातून सुप्रसिद्ध गायक मोहम्मद रफी, ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर, सुमन कल्याणपुरकर डॉक्टर अर्पणाताई मुंठे यांना त्यांच्या अजरामर संगीत योगदानासाठी सुरेल श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे. हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय तसेच सदाबहार गीतांच्या माध्यमातून या मान्यवर कलाकारांच्या स्मृतींना उजाळा दिला जाणार आहे.

कार्यक्रमात सिंगर मनोज वानखेडे, चंद्रकांत बी. सिंगर, शिवाती सिंगर आणि ऋचा बिरारी हे कलाकार आपल्या गायनातून रसिकांना मंत्रमुग्ध करणार आहेत. तसेच पूजा नृत्य सादरीकरण करणार असून करुणा सोनार कार्यक्रमाचे निवेदन करणार आहेत. उत्कृष्ट संगीत आणि ध्वनीव्यवस्थेमुळे या सुरेल मैफलीला विशेष रंगत येणार आहे. विजय शुकल यांच्यावर साउंड व्यवस्थापनाची जबाबदारी राहणार आहे.

पावसामुळे आधीचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आल्यानंतर आयोजकांनी रसिकांच्या आग्रहाचा मान राखत हा कार्यक्रम पुन्हा आयोजित केला आहे. त्यामुळे अमळनेर शहरातील संगीतप्रेमींसाठी १३ ऑगस्टची संध्याकाळ सुरेल आणि अविस्मरणीय ठरणार आहे.

‘सुरांची साथ… संगीताची मैफल… आणि आपल्या उपस्थितीची अमूल्य साथ!’ या भावनेतून आयोजकांनी अमळनेरकर नागरिकांनी आपल्या आप्तेष्टांसह कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहून कलाकारांना दाद द्यावी, असे आवाहन केले आहे.

या कार्यक्रमाचे ऑर्गनायझर सुनील वाघ असून अधिक माहितीसाठी 9373698569, 9960419254 या क्रमांकांवर संपर्क साधता येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed