जळगावात जागतिक उर्दू दिन उत्साहात साजरा; उर्दू भाषेच्या सेवकांचा गौरव पत्रकार भवनात आयोजित कार्यक्रमात उर्दू पत्रकार, सोशल मीडिया प्रतिनिधी आणि छायाचित्रकारांचा सन्मान; अल्लामा इक्बाल यांच्या साहित्यिक योगदानाचे स्मरण.
24 प्राईम न्यूज 10 Nov 2026

जळगाव : शायर-ए-मशरिक डॉ. अल्लामा इक्बाल यांच्या जयंतीनिमित्त ९ नोव्हेंबर रोजी जागतिक उर्दू दिन जळगाव येथील पत्रकार भवनात उत्साहपूर्ण आणि साहित्यिक वातावरणात साजरा करण्यात आला. उर्दू भाषा, साहित्य आणि पत्रकारितेच्या संवर्धनासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या योगदानाची दखल घेत त्यांचा सन्मान करून गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात उर्दू फलकाचे अनावरण करून करण्यात आली. मुफ्ती खालिद साहेब आणि युसूफ मकरा यांच्या हस्ते जफर शेख, डॉ. गयास उस्मानी, डॉ. फैज शाह, मोईन उस्मानी, वसीम शाह, असलम पिंजारी, साजिद शेख, सैयद चाँद आणि फारूक शेख यांच्या उपस्थितीत हा प्रारंभिक सोहळा पार पडला.
पत्रकारिता, सोशल मीडिया आणि छायाचित्रण क्षेत्रातील योगदानाचा गौरव
उर्दू पत्रकारिता, सोशल मीडिया तसेच छायाचित्रण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यामध्ये मुश्ताक करीमी, इमरान खान (जामनेर), आसिफ शेख, अकबर सलीम पटेल, जयान अहमद शेख, मतीन पटेल, वाहिद इमाम, हाफिज अब्दुल रहीम, ताओसिफ शेख (जामनेर), सलीम रंगरेज, नूर मोहम्मद, सलीम खान, शाहीर तेली, सिकंदर रंगरेज, रईस शेख आणि नूर शेख यांच्यासह सईद पटेल व अकील ब्यावली यांचा समावेश होता. या सत्कारामुळे उर्दू भाषेसाठी कार्य करणाऱ्यांना प्रोत्साहन मिळाले.
उर्दू भाषेचा समृद्ध वारसा जपण्याचे आवाहन
कार्यक्रमात वसीम शाह, डॉ. फैज शाह, जफर शेख, युसूफ मकरा आणि डॉ. गयास उस्मानी यांनी मनोगत व्यक्त केले. उर्दू भाषेचा इतिहास, तिची गोडी, साहित्यिक परंपरा आणि आजच्या आधुनिक काळातील महत्त्व यावर त्यांनी प्रकाश टाकला.
अध्यक्षीय भाषणात मुफ्ती खालिद साहेब यांनी उर्दू भाषेचे संरक्षण आणि संवर्धन करण्याची गरज अधोरेखित केली. नव्या पिढीपर्यंत उर्दू भाषेचा समृद्ध वारसा पोहोचविण्यासाठी समाजातील प्रत्येकाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. उर्दू ही केवळ संवादाची भाषा नसून संस्कृती, साहित्य, बंधुभाव आणि माणुसकीला जोडणारा अनमोल ठेवा असल्याचे वक्त्यांनी नमूद केले.
अल्लामा इक्बाल यांच्या साहित्यिक योगदानाचे स्मरण
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मोईन उस्मानी यांनी केले. त्यांनी डॉ. अल्लामा इक्बाल यांच्या जीवनकार्याचा, काव्यप्रतिभेचा आणि साहित्यिक योगदानाचा आढावा घेत त्यांच्या विचारांचे महत्त्व स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमर कासिम यांनी प्रभावीपणे केले, तर आभार प्रदर्शन अॅड. आमिर फारूक यांनी केले.
उर्दू भाषेची गोडी केवळ पुस्तकांपुरती मर्यादित न राहता ती घराघरांत, नव्या पिढीत, पत्रकारितेत आणि समाजाच्या विविध क्षेत्रांत रुजावी, हा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आल.
