अमळनेरमध्ये १३ ऑगस्टला भव्य कावड यात्रा; हजारो शिवभक्त होणार सहभागी.
अमळनेर/आबिद शेख


श्री. वर्णेश्वर महादेव मंदिर संस्थानचे अध्यक्ष सुभाष चौधरी यांच्या संकल्पनेतून गेल्या १२ वर्षांपासून या कावड यात्रेची परंपरा सुरू आहे. यंदाही यात्रेचे भव्य नियोजन करण्यात आले असून परिसरातील हजारो शिवभक्त या धार्मिक सोहळ्यात सहभागी होणार आहेत.

जळोद येथून पवित्र जल घेऊन अमळनेरकडे प्रस्थान
रढावण, सुंदरपट्टी, हेडवे, नंदगाव, तासखेडा, सानेनगर, गांधली, अमळगाव तसेच अमळनेर शहरातील मोठ्या संख्येने शिवभक्त कावड यात्रेत सहभागी होणार आहेत.
सकाळी ९ वाजेपर्यंत दगडी दरवाजा व श्री. वर्णेश्वर महादेव मंदिर संस्थान येथे शिवभक्तांनी एकत्र जमावे. त्यानंतर वाहनाने जळोद येथील सूर्यकन्या तापी नदीच्या पात्रात जाऊन तापीमाईचे पूजन करण्यात येणार आहे. त्यानंतर कावडीमध्ये पवित्र जल भरून वाजंत्रीच्या गजरात नाचत-गात अमळनेरच्या दिशेने प्रस्थान करण्यात येईल.
कावड यात्रेत शहरासह परिसरातील शेकडो शिवभक्त सहभागी होणार असून, यात्रेमुळे संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होणार आहे.
शिवभक्तांना सहभागी होण्याचे आवाहन
पवित्र श्रावण महिन्यात कावड यात्रेत सहभागी होऊन पुण्याचा लाभ घ्यावा आणि भगवान महादेवाचा आशीर्वाद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
तसेच ज्यांना कावड यात्रेत पायी सहभागी होणे शक्य नाही, त्यांनी १३ ऑगस्ट रोजी जळोद मार्गावर सकाळी १ ते २ वाजेच्या दरम्यान शिवभक्तांची भेट घेऊन यात्रेला शुभेच्छा द्याव्यात, असे आवाहन कावड यात्रेचे प्रमुख शिवभक्त सुभाष पाटील, भिकन वाडीले आणि सुशील भोईटे यांनी केले आहे.
श्रावणातील या धार्मिक सोहळ्याची शिवभक्तांमध्ये मोठी उत्सुकता असून, अमळनेर परिसरात भक्तिमय वातावरण पाहायला मिळणार आहे.

