एस. के. ज्वेलर्सच्या पहिल्या वर्धापनदिनानिमित्त आकर्षक सुवर्णखरेदी योजना; सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर केवळ ४ टक्के दर!
अमळनेर/आबिद शेख 
अमळनेर : गुणवत्ता, विश्वासार्हता, आकर्षक डिझाइन्स आणि उत्कृष्ट ग्राहकसेवा या चार प्रमुख वैशिष्ट्यांच्या जोरावर अमळनेरच्या सुवर्ण व्यवसायात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या एस. के. ज्वेलर्सने यशस्वी वाटचालीत आणखी एक मानाचा टप्पा गाठला आहे. एस. के. ज्वेलर्सच्या दुसऱ्या शाखेचा पहिला वर्धापनदिन उत्साहात साजरा होत असून, अवघ्या एका वर्षात या शाखेने ग्राहकांचा विश्वास आणि पसंती मिळवत व्यवसायात उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

संचालक सचिन भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली एस. के. ज्वेलर्सने ग्राहकांशी केवळ व्यावसायिक संबंध न ठेवता विश्वासाचे नाते निर्माण करण्यावर भर दिला आहे. शुद्धता, पारदर्शक व्यवहार आणि गुणवत्तापूर्ण सेवा या तत्त्वांमुळे संस्थेने अल्पावधीतच ग्राहकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे.
बदलत्या काळानुसार ग्राहकांची आवड, फॅशनमधील नवनवीन ट्रेंड आणि दागिन्यांच्या आकर्षक डिझाइन्स यांचा विचार करून एस. के. ज्वेलर्सने आपल्या दालनात विविध प्रकारच्या दागिन्यांची उपलब्धता करून दिली आहे.
पहिल्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून ग्राहकांसाठी विशेष सुवर्णखरेदी योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर केवळ ४ टक्के दर आकारण्यात येणार आहे. त्यामुळे सण-समारंभ, विवाह सोहळे तसेच आवडीचे दागिने खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी ही एक उत्तम संधी ठरणार आहे.
ग्राहकांनी या विशेष वर्धापनदिन ऑफरचा लाभ घ्यावा, असे आवाहन एस. के. ज्वेलर्सचे संचालक सचिन भामरे यांनी केले आहे.
