भुसावळ–उधना विशेष ट्रेनमुळे प्रवाशांना दिलासा; अमळनेरसह प्रमुख स्थानकांवर थांबा.

0

अमळनेर/आबिद शेख 


भुसावळ : भुसावळहून सुरतच्या दिशेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ट्रेन क्रमांक 04155 भुसावळ–उधना विशेष ट्रेन सोमवार आणि गुरुवारी धावणार आहे.


ही विशेष ट्रेन भुसावळ स्थानकावरून सकाळी 7:55 वाजता सुटून दुपारी 1:15 वाजता उधना जंक्शनला पोहोचणार आहे. सुमारे 331 किलोमीटरचे अंतर ही ट्रेन 5 तास 20 मिनिटांत पूर्ण करणार आहे.
या ट्रेनला धरणगाव, अमळनेर, नंदुरबार आणि व्यारा यांसह प्रमुख स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे. त्यामुळे अमळनेरसह परिसरातील सुरत, उधना आणि गुजरातकडे जाणाऱ्या प्रवाशांना मोठी सोय होणार आहे.


ट्रेन क्रमांक : 04155
मार्ग : भुसावळ (BSL) ते उधना जं. (UDN)
भुसावळ सुटण्याची वेळ : सकाळी 7:55
उधना आगमन : दुपारी 1:15
प्रवासाचा कालावधी : सुमारे 5 तास 20 मिनिटे
प्रवासाचे दिवस : सोमवार व गुरुवार
उपलब्ध वर्ग : Sleeper (SL) आणि 3A
प्रवाशांनी प्रवासापूर्वी रेल्वेच्या अधिकृत वेळापत्रकातून गाडीची अद्ययावत माहिती तपासून प्रवासाचे नियोजन करावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed