दिवाळीच्या सणासाठी दागिन्यांच्या खरेदीवर श्री बालाजी गोल्ड ज्वेलर्समध्ये खास ऑफर; घडणावळीवर थेट सूट.
अमळनेर/आबिद शेख

अमळनेर : दिवाळी, धनत्रयोदशी आणि आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांसाठी श्री बालाजी गोल्ड ज्वेलर्सतर्फे आकर्षक सुवर्णखरेदी योजना जाहीर करण्यात आली आहे. पारंपरिक दागिन्यांपासून ते आधुनिक फॅशनला साजेशा नवनवीन डिझाइन्सपर्यंत विविध प्रकारच्या दागिन्यांचे भव्य कलेक्शन येथे उपलब्ध करून देण्यात आले आहे.
आकर्षक नेकलेस, ठुशी, बांगड्या, अंगठ्या, कानातील दागिने तसेच महिलांच्या पसंतीचे विविध डिझाइन्स ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. दिवाळी, धनत्रयोदशी, भाऊबीज तसेच लग्नसमारंभ आणि कौटुंबिक सोहळ्यांसाठी आवश्यक असलेल्या दागिन्यांची खरेदी करण्यासाठी ग्राहकांना येथे विविध पर्याय उपलब्ध आहेत.
सोन्याचे दागिने खरेदी करताना घडणावळीचा खर्च हा ग्राहकांसाठी महत्त्वाचा मुद्दा असतो. ही बाब लक्षात घेऊन श्री बालाजी गोल्ड ज्वेलर्सने सोन्याच्या दागिन्यांच्या घडणावळीवर थेट सूट जाहीर केली आहे. त्यामुळे ग्राहकांना आपल्या आवडीचे दागिने खरेदी करताना विशेष बचतीचा लाभ घेता येणार आहे.

ही विशेष योजना नोव्हेंबर २०२६ ते डिसेंबर २०२६ या कालावधीत लागू राहणार असून, दिवाळी आणि धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोन्याची खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी ही उत्तम संधी ठरणार आहे. आपल्या प्रियजनांना सोन्याचा दागिना भेट देण्याचा आनंद असो किंवा शुभमुहूर्तावर नवीन दागिने खरेदी करण्याची इच्छा, प्रत्येक प्रसंगासाठी येथे आकर्षक पर्याय उपलब्ध आहेत.
ग्राहकांनी या विशेष योजनेचा लाभ घेत आपल्या पसंतीचे दागिने खरेदी करावेत, असे आवाहन श्री बालाजी गोल्ड ज्वेलर्सच्या वतीने करण्यात आले आहे.
श्री बालाजी गोल्ड ज्वेलर्स आपल्या सोन्याच्या खरेदीचे विश्वासार्ह ठिकाण! पत्ता : दगडी दरवाजाजवळ, सराफ बाजार, अमळनेर. मो. ७६९८२४८०९
