नंदुरबार शहरात खळबळ : अल्पवयीनांवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी युवक अटकेत; पोक्सोसह गंभीर गुन्हा दाखल.

नंदुरबार, प्रतिनिधी : नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात अल्पवयीन बालकांवरील लैंगिक अत्याचार, लैंगिक शोषण व धमकी दिल्याप्रकरणी पोक्सो कायद्यासह विविध गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणात शहरातील रायसिंगपुरा येथील २२ वर्षीय चेतन प्रकाश कोळी याला पोलिसांनी अटक केली असून, या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

फिर्यादीनुसार, संशयिताने अल्पवयीन मुलांसह काही तरुणांवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. तसेच पीडितांचे अश्लील व्हिडिओ व छायाचित्रे मोबाईलमध्ये साठवून ठेवून ती प्रसारित करण्याची धमकी देत लैंगिक शोषण केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
फिर्यादीत नमूद केल्यानुसार, हे प्रकार २०२२ पासून ६ ऑगस्ट २०२६ या कालावधीत सुरू असल्याचा दावा करण्यात आला आहे. घटना जीटीपी कॉलेज परिसर, रायसिंगपुरा येथील घर तसेच इतर ठिकाणी घडल्याचा आरोप आहे.
दरम्यान, संशयिताच्या मोबाईलमधून दोनशेहून अधिक अश्लील व्हिडिओ क्लिप आढळल्याची शहरात चर्चा असून, या डिजिटल पुराव्यांची फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे. या व्हिडिओंची सत्यता आणि त्यांचा गुन्ह्याशी संबंध याबाबत पोलीस सखोल तपास करत आहेत.
या प्रकरणाच्या अनुषंगाने फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी भेट देऊन पुरावे संकलित केले असून, ई-साक्ष नोंदविण्यात आली आहे. घटनास्थळांचे व्हिडिओ रेकॉर्डिंगही करण्यात आले आहे.
पोलिसांनी संशयिताला अटक केली असून, प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. तपासात आणखी महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
रवि ज्वेलर्स,
सराफ बाजार, अमळनेर,
Mob. 70 74 74 21 21.
सोने चांदी आजचे भाव
24 Ct सोने 99.50% : ₹. 147000
22 Ct सोने 91.60% : ₹. 135300
18 Ct सोने 75.00% : ₹. 113200
शुद्ध चांदी 999%:₹. 2340/-
भाव प्रती 10 ग्राम
