महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेच्या अमळनेर तालुकाप्रमुखपदी राजेंद्र पाटील यांची नियुक्ती.
अमळनेर | आबिद शेख

नियुक्तीनंतर राजेंद्र पाटील यांनी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी, त्यांच्या हितासाठी सातत्याने काम करण्याबरोबरच संघटना अधिक मजबूत करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त केला.

या नियुक्तीबद्दल शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. तसेच स्व. अनिल अंबर पाटील माध्यमिक विद्यालय व डॉ. अस्मिता प्रतापराव दिघावकर उच्च माध्यमिक विद्यालय, मंगरूळ येथील सहकारी, पू. साने गुरुजी पतपेढीचे संचालक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी तसेच मित्रपरिवाराकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून, त्यांच्या भावी कार्यासाठी सर्व स्तरातून शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.

