प्रताप हायस्कूलच्या मुख्याध्यापिका एस. पी. बाविस्कर सेवानिवृत्त; ‘आदर्श मुख्याध्यापिका’ राष्ट्रीय पुरस्काराने गौरव सेवानिवृत्तीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना पावभाजीची मेजवानी.

0

अमळनेर | आबिद शेख 

अमळनेर येथील खान्देश शिक्षण मंडळ संचलित ऐतिहासिक प्रताप हायस्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुरेखा प्रल्हाद (एस. पी.) बाविस्कर या नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्या. त्यांच्या तब्बल चार दशकांच्या शैक्षणिक सेवेला गौरव देण्यासाठी रोटरी हॉल येथे भावपूर्ण सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले.

याच प्रसंगी त्यांच्या उल्लेखनीय शैक्षणिक योगदानाची दखल घेत ‘नॅशनल ह्युमन राईट्स अँड अँटी करप्शन सोशल जस्टिस फाउंडेशन ऑफ इंडिया’ या संस्थेतर्फे त्यांना ‘आदर्श मुख्याध्यापिका’ हा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सेवानिवृत्तीच्या आनंदोत्सवानिमित्त शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना पावभाजीची मेजवानी देण्यात आली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांनी आपल्या लाडक्या मुख्याध्यापिकांना भावपूर्ण निरोप दिला.
समारंभाच्या अध्यक्षस्थानी वसुंधरा लांडगे या होत्या. यावेळी अमळनेर महिला मंच, वीरांगणा महिला मंच, डी. आर. कन्या शाळेतील शिक्षिका, खान्देश शिक्षण मंडळाचे पदाधिकारी, विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी डी. एन. पालवे, पी. डी. शेवाळे, बी. एस. पाटील, नम्रता दोरकर, मुख्याध्यापिका एस. एस. सूर्यवंशी, राहुल पाटील, डॉ. विजय मांटे, शीला पाटील, डी. एच. ठाकूर तसेच कुटुंबीय रामचंद्र सपकाळे, अक्षय सपकाळे आणि प्राची सपकाळे यांनी मनोगतातून श्रीमती बाविस्कर यांच्या शिस्तप्रिय, सेवाभावी व विद्यार्थीकेंद्री कार्याचा गौरव केला.
उत्तरपर भाषणात श्रीमती बाविस्कर यांनी संस्था, सहकारी, विद्यार्थी, पालक आणि हितचिंतकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. त्यानंतर खान्देश शिक्षण मंडळाचे अध्यक्ष विनोद अग्रवाल, उपाध्यक्ष कमल कोचर, विश्वस्त माधुरी पाटील, कार्याध्यक्ष नीरज अग्रवाल, कार्यउपाध्यक्ष जितेंद्र जैन, ज्येष्ठ संचालक हरीअण्णा वाणी, योगेश मुंदडे, प्रदीप अग्रवाल आदींच्या हस्ते शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती पी. पी. जोशी यांनी केले, तर आभार प्रदर्शन डी. एन. पालवे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed