अमळनेरमध्ये पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिराचे आयोजन; उमेदवारांना तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळणार ५ नोव्हेंबर रोजी प्रताप महाविद्यालयात शिबिर; मैदानी व लेखी परीक्षेसह आवश्यक कागदपत्रांबाबत मार्गदर्शन.
अमळनेर/आबिद शेख 
अमळनेर : पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या अमळनेर शहर व तालुक्यातील तरुण-तरुणींसाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. जळगाव जिल्हा पोलीस प्रशासनाच्या पुढाकारातून पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

जळगावचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते (चाळीसगाव) आणि अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत यांच्या संकल्पनेतून या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांना अनुभवी पोलीस तज्ज्ञांकडून योग्य मार्गदर्शन मिळावे आणि त्यांची भरती प्रक्रियेची तयारी अधिक सक्षम व्हावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.

या प्रशिक्षण शिबिरात उमेदवारांना मैदानी परीक्षेची तयारी, लेखी परीक्षेचे स्वरूप व अभ्यासाचे मार्गदर्शन तसेच पोलीस भरतीसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे याबाबत सविस्तर माहिती दिली जाणार आहे.
हे शिबिर गुरुवार, दि. ५ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ८.३० वाजता कै. काकासाहेब शंकरराव राणे सभागृह, प्रताप महाविद्यालय, अमळनेर येथे आयोजित करण्यात आले आहे.

तरी अमळनेर शहर व तालुक्यातील पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या सर्व इच्छुक उमेदवारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

