अमळनेरकरांसाठी एसटी महामंडळाची दिवाळीची खास भेट! पुण्यासाठी नवीन जादा बससेवा सुरू; सायंकाळी ७ वाजता सुटणार बस.
अमळनेर/आबिद शेख

अमळनेर : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती गर्दी आणि मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या जळगाव विभागामार्फत अमळनेर तालुक्यातील प्रवाशांसाठी विशेष जादा बससेवा सुरू करण्यात येत आहे.

अमळनेर येथून पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी ही विशेष बससेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सदर बस अमळनेर बसस्थानकावरून दररोज सायंकाळी ७ वाजता सुटणार आहे.

या बसचा मार्ग अमळनेर – धुळे – मालेगाव – मनमाड – शिर्डी – अहिल्यानगर – पुणे असा राहणार आहे. तसेच या बसमध्ये NCMC कार्डवरील सर्व सवलती लागू राहणार असल्याची माहिती एसटी महामंडळाच्या वतीने देण्यात आली आहे.

दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांना या बससेवेचा मोठा फायदा होणार असून प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क :
* राकेश शिवदे – 8208014691
* प्रमोद बाविस्कर – 9511761158
* मुकेश सेंदाणे – 9270839990
* सतीश सातपुते – 9423935118

