धुळे रस्त्यावरील एलआयसी कॉलनीत चेंबर ओव्हरफ्लो; साचलेल्या पाण्यामुळे दुर्गंधी, नागरिक त्रस्त.

0

अमळनेर/आबिद शेख 


अमळनेर : शहरातील धुळे रस्त्यावरील एलआयसी कॉलनी परिसरात दीपाली मेन्स पार्लर समोरील चेंबरमधून सांडपाणी सतत बाहेर येत असल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून नागरिकांना ये-जा करताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.


साचलेल्या घाण पाण्यामुळे डासांची उत्पत्ती होण्याची तसेच साथीच्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे. परिसरातील नागरिकांनी संबंधित विभागाने तातडीने या समस्येकडे लक्ष देऊन चेंबरची दुरुस्ती करून साचलेल्या पाण्याचा निचरा करावा, अशी मागणी केली आहे.
नगरपरिषद प्रशासनाने या समस्येची तात्काळ दखल घेऊन आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed