आदर्श कार्याची दखल; निंभोराच्या सरपंच सौ. कुमोदिनी विनोद पाटील यांना ‘आदर्श सरपंच’ पुरस्कार.
अमळनेर/आबिद शेख

अमळनेर, दि. ३ ऑगस्ट : निंभोरा ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. कुमोदिनी विनोद पाटील यांना गावातील विकासकामे, लोकाभिमुख प्रशासन आणि उत्कृष्ट कार्याची दखल घेत राष्ट्रीय मानव अधिकार एवं भ्रष्टाचार विरोधी सामाजिक न्याय फाउंडेशन यांच्या वतीने ‘आदर्श सरपंच’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

ग्रामविकासासाठी सातत्याने केलेले प्रयत्न, नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी घेतलेले पुढाकार तसेच विविध विकासकामांची प्रभावी अंमलबजावणी यामुळे त्यांची निवड या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी करण्यात आली.
या सन्मानाबद्दल निंभोरा ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ तसेच विविध स्तरातून सौ. कुमोदिनी पाटील यांचे अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर सौ. कुमोदिनी विनोद पाटील यांनी या सन्मानाचे श्रेय निंभोरा ग्रामस्थ, ग्रामपंचायत सदस्य, अधिकारी व सहकाऱ्यांना देत सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले. भविष्यातही गावाच्या सर्वांगीण विकासासाठी अधिक जोमाने काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
