अमळनेरातील आरिफ हार्डवेअरचे मालक शेख सैफुद्दीन आरिफ यांचे निधन.
अमळनेर/आबिद शेख

अमळनेर, दि. ३ ऑगस्ट : अमळनेर येथील सुप्रसिद्ध आरिफ हार्डवेअरचे मालक स्व. शेख सैफुद्दीन मुन्नवरअली आरिफ (बोहरी) यांचे दि. २ ऑगस्ट २०२६ रोजी वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या निधनाने अमळनेर शहरातील व्यापारी व सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात तीन मुले, एक मुलगी, सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे.
ते शेख अझरभाई यांचे वडील होत.
