बदलत्या वयातील मुलींसाठी साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठानतर्फे विशेष मार्गदर्शन कार्यशाळा.
अमळनेर/आबिद शेख

अमळनेर : बदलत्या वयातील मुलींमध्ये शारीरिक, मानसिक व बौद्धिक विकासाबाबत योग्य जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठान, अमळनेर यांच्या वतीने ‘बदलत्या वयातील जाण-भान’ या विषयावर विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

ही कार्यशाळा रविवार, दि. ९ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठान, गळवाडे रोड, अमळनेर येथे होणार आहे.
कार्यशाळेत मुलींना शारीरिक व मानसिक बदल, प्रेम आणि आकर्षण, स्वातंत्र्य व स्वैराचारातील फरक, कुटुंब व समाजाप्रती जबाबदारीची जाणीव, मासिक पाळी व्यवस्थापन, व्यायामाचे महत्त्व, शरीर व मन सुदृढ ठेवण्याचे मार्ग, तसेच बौद्धिक सौंदर्य वाढविण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
ही कार्यशाळा फक्त ५० मुलींसाठी असून पूर्वनोंदणी आवश्यक आहे. इच्छुकांनी ९०७५५७०५१० या क्रमांकावर संपर्क साधून नाव नोंदणी करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या उपक्रमाचे आयोजन साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठान, अमळनेर यांच्या वतीने करण्यात आले आहे.
