ऑगस्टच्या सुरुवातीलाच मोठा दिलासा! व्यावसायिक एलपीजी सिलिंडर २०० रुपयांनी स्वस्त.

0

24 प्राईम न्यूज 2 Aug 2026


ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच दिवशी व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. तेल विपणन कंपन्यांनी १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात तब्बल २०० रुपयांची कपात केली असून, नवीन दर १ ऑगस्टपासून लागू झाले आहेत.


या दरकपातीमुळे हॉटेल, रेस्टॉरंट, केटरिंग तसेच इतर व्यावसायिक आस्थापनांच्या खर्चात काही प्रमाणात घट होणार आहे. दरकपातीनंतर मुंबईत १९ किलोचा व्यावसायिक एलपीजी सिलिंडर २,६९१.५० रुपयांना उपलब्ध होणार आहे.
विशेष म्हणजे, सलग दुसऱ्या महिन्यात व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत कपात करण्यात आली आहे. यापूर्वी १ जुलै रोजी १८३.५० रुपयांची कपात करण्यात आली होती. त्यामुळे जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांत मिळून व्यावसायिक सिलिंडरच्या दरात सुमारे ३८० रुपयांची घट झाली आहे.
व्यावसायिक एलपीजीच्या दरात झालेल्या या घसरणीमुळे व्यावसायिकांना आर्थिक दिलासा मिळणार असून, त्याचा अप्रत्यक्ष फायदा ग्राहकांनाही होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed