अतिवृष्टीग्रस्त भागांची खासदार स्मिता वाघ यांच्याकडून पाहणी; नुकसानग्रस्तांना मदतीचे आश्वासन.

0

अमळनेर/आबिद शेख 


अमळनेर : अमळनेर शहर व परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या भागांची खासदार स्मिता वाघ यांनी शनिवारी प्रत्यक्ष पाहणी करून नुकसानग्रस्त नागरिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नागरिकांच्या अडचणी जाणून घेत शासनाच्या नियमांनुसार सर्व पात्र लाभार्थ्यांना मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.


अतिवृष्टीनंतर खासदार वाघ यांनी तत्काळ जिल्हाधिकारी रोहन घुगे, प्रांताधिकारी मयूर भंगाळे, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, मुख्याधिकारी गणेश शिंदे तसेच गटविकास अधिकारी एन. आर. पाटील यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून नुकसानग्रस्त घरांचे तातडीने पंचनामे करण्याच्या तसेच बेघर झालेल्या नागरिकांना शासनाच्या नियमानुसार मदत मिळावी यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
आज प्रत्यक्ष पाहणीदरम्यान त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना मदत कार्यात गती आणण्याचे निर्देश दिले. नागरिकांशी संवाद साधताना, “या संकटाच्या काळात नागरिकांनी धीर सोडू नये. शासन आणि आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी आहोत. प्रत्येक पात्र नुकसानग्रस्ताला न्याय मिळावा यासाठी मी स्वतः पाठपुरावा करणार आहे,” असे आश्वासन खासदार वाघ यांनी दिले.
यावेळी भाजपा मंडल अध्यक्ष जिजाबराव पाटील, शहराध्यक्ष योगेश महाजन, पातोंडा अध्यक्ष राहुल पाटील, नगरसेवक बाळू पाटील, नगरसेवक विजय पाटील, माजी अध्यक्ष हरचंद लांडगे, हिरालाल पाटील, राकेश पाटील, दीपक भोई, मच्छिंद्र लांडगे, सरचिटणीस देवा लांडगे, युवा मोर्चाचे राहुल चौधरी, कल्पेश पाटील, राजेश खरारे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.
नुकसानग्रस्त नागरिकांनी खासदारांनी तातडीने दखल घेत प्रत्यक्ष पाहणी केल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed