लोंढवे विद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी.

0

अमळनेर/आबिद शेख 


अमळनेर: स्व. आबासो एस. एस. पाटील माध्यमिक विद्यालय, लोंढवे येथे शनिवार (दि. १ ऑगस्ट) रोजी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.


कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यानंतर विद्यार्थ्यांनी दोन्ही महापुरुषांच्या जीवनकार्य, राष्ट्रप्रेम, समाजसुधारणा, शिक्षणाविषयीची तळमळ तसेच साहित्य क्षेत्रातील त्यांच्या अमूल्य योगदानावर मनोगते व्यक्त केली.
यावेळी विद्यालयाचे शिक्षक श्री. डी. बी. सोनवणे सर तसेच मुख्याध्यापक मा. बाळासाहेब जीवन पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. लोकमान्य टिळक यांची राष्ट्रभक्ती, स्वाभिमान व अण्णाभाऊ साठे यांचे सामाजिक समता, मानवता आणि संघर्षाचे विचार विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात अंगीकारावेत, असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमास विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. डी. एम. पवार यांनी केले. आभार प्रदर्शनानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed