विशेष गहन पुनरावलोकन (SIR) अंतर्गत ३० व ३१ जुलै रोजी विशेष मतदार शिबिर; नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन.
अमळनेर | आबिद शेख

मतदार यादीतील नोंदी अद्ययावत करण्यासाठी सुरू असलेल्या विशेष गहन पुनरावलोकन (SIR) अभियानांतर्गत अमळनेर शहरातील संबंधित मतदारांसाठी ३० व ३१ जुलै २०२६ रोजी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र मतदारांनी या शिबिरात उपस्थित राहून आवश्यक कागदपत्रांसह SIR फॉर्म भरून प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन मतदार नोंदणी विभागाकडून करण्यात आले आहे.
या मोहिमेअंतर्गत यादी भाग क्रमांक १३० ते १३८ तसेच १६९ ते १७८ मधील मतदारांसाठी विशेष कॅम्प आयोजित करण्यात आला आहे. हा कॅम्प तांबेपुरा सिंधी कॅम्प, ८ मजली इमारतीजवळ, महादेव मंदिरालगत, तरुण कुडापा मित्र मंडळ, शिरूड नाका परिसरात होणार आहे.

शिबिर ३० आणि ३१ जुलै २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.
या शिबिरासाठी श्री. सुजित साळुंखे (मो. ९०९९१३३७७१) आणि श्री. अजित लांडे (मो. ७७२१८०५९५७) यांची पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. संबंधित BLO यांच्या माध्यमातून शिबिराचे नियोजन करण्यात आले असून, स्थानिक लोकप्रतिनिधी व विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनाही या उपक्रमाची माहिती देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जास्तीत जास्त मतदारांनी SIR फॉर्म भरून १०० टक्के कामकाज पूर्ण करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले आहे.
आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड
मतदार ओळखपत्र
जन्मतारखेचा पुरावा (लागू असल्यास)
मोबाईल क्रमांक
