खान्देशवासीयांसाठी आनंदाची बातमी! 1 ऑगस्टपासून खान्देश एक्सप्रेस आठवड्यातील 6 दिवस धावणार.

0

अमळनेर/आबिद शेख 


खान्देश आणि मुंबईदरम्यान प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. दादर–भुसावळ खान्देश एक्सप्रेस (19003/19004) ही गाडी 1 ऑगस्ट 2026 पासून आठवड्यातील 6 दिवस नियमित धावणार आहे.
या निर्णयामुळे खान्देशातील प्रवाशांना अधिक नियमित, सोयीस्कर आणि किफायतशीर रेल्वे प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. विशेष गाड्यांच्या तुलनेत कमी भाड्यात प्रवास करता येणार असल्याने विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक तसेच सर्वसामान्य प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.


खान्देश एक्सप्रेसचे प्रमुख थांबे :
भुसावळ, जळगाव, धरणगाव, अमळनेर, नंदुरबार, नवापूर, नवसारी, वापी, पालघर, विरार, बोरीवली आणि दादर.
या गाडीच्या नियमित सेवेमुळे खान्देश आणि मुंबई यांमधील दळणवळण अधिक सुलभ होण्यास मदत होणार असून प्रवाशांचा वेळ आणि खर्च दोन्हीची बचत होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed