शालार्थ आयडी घोटाळा : शिक्षण संस्थाचालक संजय गरुड अटकेत; एसआयटीकडून तपासाला वेग.

0

24 प्राईम न्यूज 29 Jul 2026


राज्यभर चर्चेत असलेल्या शालार्थ आयडी घोटाळ्याप्रकरणी नाशिक पोलिसांनी मोठी कारवाई करत जळगाव जिल्ह्यातील शिक्षण संस्थाचालक संजय गरुड याला सोलापूर जिल्ह्यातील नातेपुते येथून अटक केली आहे.
तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, बनावट शिक्षकांचे शालार्थ आयडी तयार करून शासनाच्या पगार निधीचा गैरवापर केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. या प्रकरणात शासनाच्या कोट्यवधी रुपयांच्या निधीचा अपहार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून, विशेष तपास पथक (एसआयटी) या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत आहे.


संजय गरुड हा जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात अनेक शिक्षण संस्था चालवत असल्याचे सांगितले जाते. तसेच जानेवारी २०२४ मध्ये त्याने राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षातून भाजपमध्ये प्रवेश केला होता.
दरम्यान, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना, “हा अत्यंत गंभीर घोटाळा असून एसआयटीकडून सखोल तपास सुरू आहे. या प्रकरणात जे कोणी दोषी आढळतील, त्यांच्यावर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल,” असे स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed