‘एक झाड कलाम यांच्या नावाने’ उपक्रमांतर्गत २५ वृक्षांचे रोपण गौसिया अकादमी व कादरिया फाउंडेशनचा पर्यावरण संवर्धनाचा प्रेरणादायी उपक्रम.
24 प्राईम न्यूज 28 Jul 2026

जळगाव, प्रतिनिधी : भारताचे माजी राष्ट्रपती तथा ‘मिसाईल मॅन’ म्हणून ओळखले जाणारे डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या पुण्यतिथीनिमित्त २७ जुलै रोजी गौसिया अकादमी आणि कादरिया फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘एक झाड कलाम यांच्या नावाने’ या अभियानांतर्गत मोहम्मदिया नगर येथील उस्मानिया पार्क परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला.

पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत या उपक्रमात पार्क परिसरात २५ वृक्षांची ट्री-गार्डसह लागवड करण्यात आली. लावण्यात आलेल्या वृक्षांचे संरक्षण व संवर्धन करण्यावर विशेष भर देण्यात आला. यावेळी उपस्थितांनी अधिकाधिक वृक्ष लागवड करून त्यांचे संगोपन करण्याची सामूहिक प्रतिज्ञा घेतली.
या कार्यक्रमास गौसिया अकादमीचे फहीम महतो, शब्बीर चौहान, मुश्ताक भिस्ती तसेच कादरिया फाउंडेशनचे अध्यक्ष फारूक कादरी उपस्थित होते. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) अल्पसंख्याक विभागाचे जळगाव जिल्हाध्यक्ष मजहर पठाण, काँग्रेसचे जळगाव महानगराध्यक्ष जमील शेख, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष मोहसीन शेख, हुजेफ कादरी, इलियास शेख, अनंत परिहार, अरुणा पाटील, अनिता कोळी, सय्यद सादिक अली, करीम खान, हसन गौली, हशीर पिंजरी, शोएब भाई, कासिम कादरी, फिरोज पिंजरी, रियाज काझी, युनूस पेंटर यांच्यासह गौसिया अकादमीचे पदाधिकारी, सदस्य व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमाचा उद्देश केवळ वृक्षारोपण करणे नसून, डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी दिलेला पर्यावरण संरक्षणाचा संदेश आणि राष्ट्रनिर्मितीचे विचार समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविणे हा असल्याचे आयोजकांनी सांगितले.
