५४ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात साने गुरुजी विद्यालयाचा डंका ; शिरसाळे येथे रॉकेट लॉन्चरने उद्घाटन.
अमळनेर /आबिद शेख 
अमळनेर : पंचायत समिती अमळनेर व बी.वाय. चौधरी माध्यमिक विद्यालय शिरसाळे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ५४ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात साने गुरुजी विद्यालयाने प्रथम क्रमांक पटकावला.
शिरसाळे येथे या प्रदर्शनाचे उद्घाटन खासदार स्मिता वाघ यांच्या हस्ते रिमोटद्वारे रॉकेट लॉन्चर कार्यान्वित करून करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष संजय शिरोडे अध्यक्षस्थानी होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी नगराध्यक्षा जयश्री पाटील उपस्थित होत्या.

यावेळी खा. स्मिता वाघ म्हणाल्या, विज्ञान प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांमधील संशोधक वृत्तीला चालना मिळते, टाकाऊतून टिकाऊ बनवण्याची प्रेरणा मिळते. यंदा दुष्काळी परिस्थिती असून बाष्पीभवन वाढले आहे, त्यामुळे पाण्याची काटकसर करा आणि आपल्याच भागातील पाणी जपून वापरा, असे आवाहन त्यांनी केले.
गटशिक्षणाधिकारी कविता सुर्वे यांनी प्रास्ताविक केले. विद्यार्थिनींनी स्वागतगीत व मानवी उत्क्रांतीवर आधारित गीत सादर केले. या प्रदर्शनात सुमारे ९५ विद्यार्थ्यांनी आपली विज्ञान उपकरणे सादर केली.
*विजेते :*
*लहान गट :* प्रथम – योगांक्षी संजीव पाटील (साने गुरुजी प्राथमिक), द्वितीय – निधी जगदीश पाटील (डी.आर. कन्या), तृतीय – अधिराज सुमित सूर्यवंशी (एन.टी. मुंदडा ग्लोबल), उत्तेजनार्थ – प्रीती किशोर महाजन (जि.प. देवगाव)
*मोठा गट :* प्रथम – गायत्री धनराज बोरसे (साने गुरुजी कन्या), द्वितीय – प्राक्तन प्रफुल्ल पाटील (एन.टी. मुंदडा), तृतीय – तमन्ना चंपालाल पावरा (यशवंत आश्रम पिंपळे), उत्तेजनार्थ – कुंजन श्रीकांत चव्हाण (बी.वाय. चौधरी शिरसाळे)
*प्राथमिक शिक्षक गट :* प्रथम – पूनम साळुंखे (जि.प. शहापूर), द्वितीय – सुधीर चौधरी (जि.प. तांदळी), तृतीय – उमेश पाटील (साने गुरुजी प्राथमिक)
*माध्यमिक शिक्षक गट :* प्रथम – आकाश पाटील (नगाव), द्वितीय – अनिल पाटील (सावित्रीबाई फुले कन्या), तृतीय – रितीक जैन (एन.टी. मुंदडा)
बक्षीस वितरण सोहळ्यास उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे, तहसीलदार डॉ. उमा ढेकळे, गटविकास अधिकारी एन.आर. पाटील, पो.नि. दत्तात्रय निकम, एपीआय साजिद मन्सूरी, गटशिक्षणाधिकारी कविता सुर्वे आदी उपस्थित होते.
परीक्षक म्हणून किशोर राजे, डॉ. पी.एस. कोळी, अविनाश मोरे, चंद्रशेखर पाटील, सचिन ठाकूर यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन विजय पवार व संजय पाटील यांनी केले, तर आभार मुख्याध्यापक प्रवीण पवार यांनी मानले.

