आ. अनिल पाटील यांच्या प्रयत्नाने शेतपाणंद रस्त्यांच्या कामांना गती ; १३ गावांतील ९,५७६ मीटर रस्त्यांचे भूमिपूजन.
अमळनेर /आबिद शेख 
अमळनेर : अमळनेर विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या शेतशिवारापर्यंतचा प्रवास सुकर करण्यासाठी शेतपाणंद रस्त्यांच्या विकासाला गती मिळाली आहे. माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मतदारसंघातील १३ गावांमध्ये एकूण ९,५७६ मीटर लांबीच्या शेतपाणंद रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन माजी जि.प. सदस्या सौ. जयश्री अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

पावसाळ्यात चिखलामुळे शेतात जाण्या-येण्याची अडचण, अवजारे नेण्या-आणण्याचा त्रास आणि शेतमाल बाजारात नेताना होणारी गैरसोय या शेतकऱ्यांच्या मूलभूत अडचणी या रस्त्यांमुळे दूर होणार आहेत. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली मागणी मार्गी लागल्याने संबंधित गावांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
१. ढेकू बु. – ७६७ मी., २. एकरुखी – १,५३३ मी., ३. सारबेटे खु. – २,०८३ मी., ४. बिलखेडा – १,९०७ मी., ५. कन्हेरे – १,९५३ मी., ६. सुंदरपट्टी – १,४२२ मी., ७. रडावण – २,९०१ मी., ८. वासरे – २५५ मी., ९. ब्राह्मणे – १,५९५ मी., १०. शिरसाळे खु.-बु. – १,४४० मी., ११. गंगापुरी – १,६६६ मी., १२. नालखेडे – ७०३ मी., १३. झाडी – १,०१६ मी.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक आधार पाटील, ज्येष्ठ कामगार नेते एल. टी. पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख प्रा. सुरेश पाटील, तालुका शेतकरी संघाचे गणेश भामरे यांच्यासह सर्व गावांचे सरपंच, उपसरपंच, सोसायटी चेअरमन, संचालक, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत जाणारा रस्ता हा केवळ दळणवळणाचा मार्ग नसून त्यांच्या कष्टाला साथ देणारा महत्त्वाचा दुवा आहे,” अशी भावना यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केली.

