साने गुरुजी बालवाडी विभागात “नवरात्र उत्सव”जोमात साजरा.

अमळनेर – येथील साने गुरुजी बालवाडी विभागात “नवरात्री उत्सव” जोमात साजरा करण्यात आला.
B भक्तिमय वातावरणात कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी पालक भगिनी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व नवदुर्गांचे पूजन करून शक्ती, भक्ती, आणि स्त्री शक्तीचा जागर करण्यात आला. शिक्षणामुळे समाजातील अंधकार दूर होऊ शकतो याचे बालवाडीच्या विद्यार्थिनींनी हुबेहूब दृश्य सादर केले. नंतर विद्यार्थ्यांसाठी गरबा नृत्याचे आयोजन करण्यात आले. रंगीबिरंगी पारंपारिक वेशभूषेत सजलेल्या विद्यार्थ्यांनी गरबा नृत्य सादर करून मनमुराद आनंद लुटन सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.

महिलांसाठी विविध मनोरंजक खेळांचे व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. पालकांनी उत्स्फूर्तपणे मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला. विविध खेळांमुळे कार्यक्रमात हास्य आनंद आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. विजेत्या स्पर्धकांना बक्षीस वाटप करण्यात आले. संस्थेचे सचिव व सहसचिव यांनी पालकांना नवरात्र हा केवळ देवीची उपासना करण्यापर्यंत मर्यादित नसून नारीच्या सामर्थ्याला, चैतन्याला प्रोत्साहन देण्याचा सोहळा म्हणून मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष हेमकांत पाटील, उपाध्यक्ष गुणवंतराव पाटील, सचिव घोरपडे सर, सहसचिव ॲड.बाविस्कर, सदस्य बोरसे सर तसेच सर्व कार्यकारी मंडळ, कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका, बालवाडीच्या मुख्याध्यापिका, सर्व शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी पालक उपस्थित होते.

