अमळनेरकरांसाठी खुशखबर! उधना-अमरावती सुपरफास्ट स्पेशलचे अमळनेरात जंगी स्वागत; खासदार स्मिताताई वाघ यांच्या प्रयत्नांना यश.

0

 

अमळनेर/ आबिद शेख 

अमळनेर  रेल्वे स्थानकावर आज उत्साहाचे वातावरण होते. *उधना – अमरावती सुपरफास्ट स्पेशल एक्स्प्रेस (09067/09068)* या नव्या रेल्वेगाडीचे अमळनेर स्थानकावर जल्लोषात स्वागत करण्यात आले. फटाक्यांच्या आतषबाजीत आणि घोषणाबाजी करत रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आले.

या नव्या रेल्वेसेवेमुळे अमळनेर, धरणगाव, चोपडा परिसरातील हजारो प्रवाशांना मुंबई-सुरत आणि अमरावतीकडे जाण्यासाठी एक अतिरिक्त व जलद पर्याय उपलब्ध झाला आहे.

खासदार स्मिताताई वाघ यांच्या पाठपुराव्याला यश.
जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या *खासदार स्मिताताई उदय वाघ* यांनी या गाडीला थांबा मिळावा यासाठी रेल्वे मंत्रालयाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांमुळेच या विशेष गाडीला मंजुरी मिळाली आहे.

सध्या ही गाडी *प्रायोगिक तत्त्वावर एक महिन्यासाठी* चालवली जाणार आहे. या एका महिन्यात प्रवाशांचा प्रतिसाद कसा मिळतो हे पाहून, ही गाडी *नियमित दररोज* सुरू करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासन घेणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

या स्वागत कार्यक्रमाला भाजप मंडल अध्यक्ष जिजाबराव पाटील, माजी अध्यक्ष हरचंद लांडगे, माजी ZRC मेंबर प्रितपाल बग्गा, दिलीप ठाकूर, दीपक भोई, सुरेश बाविस्कर, सुभाष पाटील, कैलास पाटील, पटवर्धन सर, शेखर कुलकर्णी, युवा मोर्चा अध्यक्ष राहुल चौधरी, कल्पेश पाटील, शिवकिरण बोरसे यांच्यासह भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते, रेल्वे प्रवासी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed