मोईज सैय्यद यांच्यावर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अमळनेर शहर सोशल मीडिया अध्यक्षपदाची जबाबदारी.
अमळनेर/आबिद शेख

अमळनेर : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अमळनेर येथील पक्ष कार्यालयात मोईज सैय्यद यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अमळनेर शहर सोशल मीडिया अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या सोशल मीडियावरील सक्रिय कार्याची दखल घेत पक्षाने त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविली.
ही नियुक्ती अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा माजी मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर करण्यात आली. यावेळी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मोईज सैय्यद यांच्याकडून संघटन बळकटीसाठी आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून पक्षाची भूमिका प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचविण्याची अपेक्षा व्यक्त केली.

नियुक्तीप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अमळनेर शहराध्यक्ष चेतन राजपूत, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भूषण भदाणे, अमळनेर युवक शहराध्यक्ष दुर्गेश पाटील, जितू भाऊ ठाकूर, विक्रांत पाटील, सचिन बाळू पाटील यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी मोईज सैय्यद यांचे अभिनंदन करून त्यांच्या भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
