गांधलीच्या इतिहासात पहिल्यांदाच महिलाराज ; विविध कार्यकारी संस्थेच्या चेअरमनपदी प्रतिभा पाटील, उपाध्यक्षपदी नलिनी देशमुख बिनविरोध.
अमळनेर /आबिद शेख

अमळनेर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या. गांधली, ता. अमळनेर येथे सत्तांतर होत संस्थेच्या इतिहासात पहिल्यांदाच महिलाराज प्रस्थापित झाले आहे.
संस्थेच्या चेअरमन व व्हा. चेअरमन पदाची निवडणूक नुकतीच पार पडली. यामध्ये चेअरमनपदी *सौ. प्रतिभा कैलास पाटील* तर व्हाईस चेअरमनपदी *सौ. नलिनी अजय देशमुख* यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मावळते चेअरमन दिनेश पवार व व्हा. चेअरमन शांताराम माळी यांच्यानंतर आता संस्थेची धुरा महिला नेतृत्वाकडे आली आहे.

गांधली सोसायटीच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन्ही प्रमुख पदांवर महिलांची बिनविरोध निवड झाल्याने सहकार क्षेत्रात एक नवा आदर्श निर्माण झाला असून संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण आहे. शेतकरी आणि सभासदांच्या विश्वासाला पात्र ठरत कारभार अधिक पारदर्शक आणि शेतकरी हिताचा करू, असा संकल्प नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सुनील पाटील, प्रवीण पाटील, महेश देशमुख, गजेंद्र साळुंखे, हिम्मत पाटील, बापुराव चव्हाण, अशोक महाजन, सीताराम भाऊ व आधार महाजन यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
निवड जाहीर होताच फटाक्यांची आतषबाजी व पेढे वाटून जल्लोष करण्यात आला. यावेळी संस्थेचे संचालक, सभासद, ग्रामस्थ व मान्यवरांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

