पत्नीला वेश्या व्यवसायासाठी भाग पाडण्याचा प्रयत्न; पती, जेठाणी व अनोळखी तरुणावर गुन्हा.

0

 अमळनेर / आबिद शेख.   

                                     

पत्नीला वेश्या व्यवसाय करायला लावण्यासाठी तिला दारू पाजून भांग खाऊ घालून तिला मारहाण केल्याची घटना १ रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास तांबेपुरा भागात नऊ वाजता घडली. पती जेठाणी आणि अनोळखी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


फिजा फिरोज पिंजारी रा तांबेपुरा नन्दगाव रस्ता या महिलेने अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली की , १ जुलै रोजी दुपारी दोन वाजता तब्येत बरी नसताना पती फिरोज रहेमतूल्ला पिंजारी हा घरी आला व त्याने देशी दारूची बाटली पुढे करून म्हणाला की तुझी तब्येत बरोबर नाही तर या बाटलीत ओ आर एस ची पावडर टाकली आहे तू पिऊन घे. त्याने ग्लास मध्ये बाटलीतील पाणी टाकले आणि फिजा ला पाजले तेव्हा तिला कळले की त्याच्यात दारू आहे तिने ते पिण्यास नकार दिला. ग्लास मधील उर्वरित दारू नवऱ्याने पिऊन घेतली. फिजा घरातील कामाला लागली सायंकाळी पतीने विचारले की तुला ते पाणी पिल्याचा त्रास होत आहे का फिजाने नाही म्हटल्यावर फिरोज ने हिरव्या रंगाची भांग ची गोळी आणून तिच्या तोंडात कोंबली आणि बळजबरीने पाणी पाजले. तिला नशा चढू लागताच त्याने त्याच्या एका मित्राला मागच्या दाराने बोलावून घेतले आणि पत्नीला तुला वेश्या व्यवसायासाठी बसवेन. त्यावेळी फिजा हात झटकून पळू लागली असता फिरोजने तिचे केस ओढून तू जर वेश्या व्यवसाय करणार नाही तर तुला जिवंत मारून टाकेल अशी धमकी दिली. तुझ्या आई वडिलांकडून पैसे मागव. त्यांनंतर पती फिरोज , जेठाणी तबससुम तन्वीर पिंजारी यांनी चापटा बुक्क्यांनी मारहाण केली. महिला घराबाहेर पळून गेली. महिलेने अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून पती ,जेठाणी आणि अनोळखी तरुण यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ७९ , ११५(२) , ३५१(२) ,३५२ प्रमाणे गुन्हा दाखल करम्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed