रोटरी क्लब अमळनेरतर्फे डॉक्टर्स डे व सीए डे उत्साहात साजरा; मान्यवर डॉक्टर व चार्टर्ड अकाउंटंटांचा सत्कार.
अमळनेर/आबिद शेख

अमळनेर : रोटरी क्लब अमळनेरच्या वतीने १ जुलै रोजी डॉक्टर्स डे आणि सीए डे निमित्त शहरातील मान्यवर डॉक्टर तसेच चार्टर्ड अकाउंटंट यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. समाजासाठी आरोग्य व आर्थिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींच्या कार्याचा गौरव करण्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.

यावेळी डॉ. राहुल मुठ्ठे, डॉ. कौस्तुभ वानखेडे, डॉ. प्रसन्ना जोशी, डॉ. शरद बाविस्कर, डॉ. जी. एम. पाटील, डॉ. विशाल जोशी, डॉ. प्रीतम जैन, डॉ. किरण बडगुजर, डॉ. अनिल वाणी, डॉ. सौरभ जैन, डॉ. निलेश जैन तसेच चार्टर्ड अकाउंटंट आकाश वर्मा आणि कीर्ती कोठारी यांचा सत्कार करण्यात आला.
कोरोना काळापासून आजपर्यंत रुग्णसेवेसाठी अहोरात्र कार्य करणाऱ्या डॉक्टरांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तसेच आर्थिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या चार्टर्ड अकाउंटंट्सना प्रोत्साहन देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमास रोटरी क्लबचे नूतन अध्यक्ष महेश पाटील, नूतन सचिव, उपनगराध्यक्ष प्रशांत निकम, चेलाराम सैनानी, सनी कोठारी, कीर्तीकुमार कोठारी, अविनाश अमृतकर, प्रतीक शाह, विनोद थोरात यांच्यासह रोटरी क्लबचे अनेक सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी डॉक्टर आणि चार्टर्ड अकाउंटंट यांच्या समाजोपयोगी कार्याचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या.
