रोटरी क्लब अमळनेर तर्फे कृषी दिनानिमित्त शेतकऱ्यांना शुभेच्छा व पर्यावरण संवर्धनासाठी सीड बॉलचे शाळेत वाटप.
अमळनेर आबिद /शेख

अमळनेर इंटरनॅशनल च्या नूतन वर्षाच्या प्रथम दिवशीच रोटरी क्लब अमळनेरची उज्वल समाजसेवेची परंपरा वारसा जोपासत नूतन अध्यक्ष महेश पाटील व नूतन सचिव व उपनगराध्यक्ष प्रशांत निकम व त्यांच्या टीमने आपल्या कामाची जोमाने सुरुवात केलेली आहे. राष्ट्रीय कृषी दिनानिमित्त आपल्या कृषी प्रधान देशात बळीराजा अन्नदाता म्हणून ओळखला जातो व हा देशाच्या आर्थिक भरभराटीत त्याच्या सिंहाच्या वाटा असतो या दिवसाचे महत्व जाणून कृषीदिनी शेतकरी बंधूंना पुष्पगुच्छ देऊन रोटरी क्लब अमळनेर तर्फे शुभेच्छा देण्यात आल्यात. याप्रसंगी तांबेपुरा, रंजाने ,तासखेडा ,नंदगाव या भागातील शेतकऱ्यांच्या समावेश होता त्यात प्रामुख्याने संजय पाटील ,भरत पाटील, सुकलाल पाटील शालिक पाटील आणि इतर शेतकरी बंधूंच्या मोठ्या संख्येने समावेश होता.

पर्यावरण व वृक्ष संवर्धन या प्रकल्पा अंतर्गत रोटरी क्लब अमळनेर व हाऊसिंग महिला ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने सुमारे दोन हजार सीड बॉल चे वितरण पी बी ए इंग्लिश मीडियम स्कूल व डी आर कन्या हायस्कूल येथे विद्यार्थ्यांना करण्यात आले होते. याप्रसंगी पीबीए इंग्लिश मीडियम चे मुख्याध्यापक श्री देवरे सर , पी ए वंजारी कु .एम एस बारी व डी आर कन्या शाळेतील मुख्याध्यापिका सौ सूर्यवंशी मॅडम
विद्यार्थिनी शिक्षक वृंद कर्मचारी आदि मोठ्या संख्येने उपस्थित होते. या दोन्ही प्रकल्पांना रोटरी क्लब तर्फे नूतन अध्यक्ष महेश पाटील व नूतन सचिव व उपनगराध्यक्ष प्रशांत निकम, चेलाराम सेनानी , डॉक्टर अनिल वाणी सनी कोठारी, प्रीत पाल सिंग बग्गा, अजय रोडगे, आशिष चौधरी आदि रोटेरीयन्स व हाऊसिंग ट्रस्टच्या सर्व महिला सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते अशी माहिती मकसूद बोहरी कळवितात.
