अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन; राज्यात धाडसत्र, सहा अन्न व्यावसायिकांचे परवाने निलंबित.
24 प्राईम न्यूज 3 Jul 2026


नवी मुंबईतील विविध हॉटेल्स व आस्थापनांची तपासणी करताना अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन आढळून आले. त्यानंतर हॉटेल पवन बार अँड रेस्टॉरंट (सीबीडी बेलापूर), साई सागर (तुर्भे), हॉटेल नाना-नानी (वाशी) तसेच एस्प्रेसो एंटरटेन्मेंट अँड हॉस्पिटॅलिटी प्रा. लि. (वाशी) या आस्थापनांवर कारवाई करण्यात आली.
अन्न व औषध प्रशासनाने सांगितले की, ग्राहकांना सुरक्षित, दर्जेदार आणि स्वच्छ अन्न उपलब्ध करून देणे हे विभागाचे प्रमुख उद्दिष्ट असून, अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांविरोधात यापुढेही कठोर कारवाई सुरूच राहणार आहे. या धाडसत्रामुळे अन्न व्यवसायिकांमध्ये खळबळ उडाली असून नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
