आज अंबऋषी टेकडीवर वडसावित्री पौर्णिमेनिमित्त वड वृक्षारोपण; नागरिकांना सहभागाचे आवाहन.

0

आबिद शेख/ अमळनेर 


अंबऋषी टेकडी बहुउद्देशीय पर्यावरण ट्रस्ट, अमळनेर यांच्या वतीने आज, शुक्रवार (दि. ३ जुलै २०२६) वडसावित्री पौर्णिमेनिमित्त अंबऋषी टेकडीवर वड वृक्षारोपणाचा विशेष उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम सकाळी ७ वाजता होणार असून, अमळनेरकरांनी आपल्या अर्धांगिनीसह उपस्थित राहून स्वतःच्या हस्ते वडाचे रोप लावावे, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.


गेल्या २० वर्षांपासून अंबऋषी टेकडी बहुउद्देशीय पर्यावरण ट्रस्ट पर्यावरण संवर्धनासाठी सातत्याने कार्यरत असून, टेकडीवर विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड व संगोपन करून सुंदर मानवनिर्मित जंगल उभे केले आहे.
या उपक्रमात सहभागी होणाऱ्या प्रत्येकाला वडाचे रोप ट्रस्टतर्फे उपलब्ध करून दिले जाणार असून, त्या रोपाच्या संगोपनाची संपूर्ण जबाबदारी ट्रस्ट स्वीकारणार आहे. अधिकाधिक नागरिकांनी या पर्यावरणपूरक उपक्रमात सहभागी होऊन निसर्ग संवर्धनात आपले योगदान द्यावे, असे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष तुळशीराम काशिनाथ भदाणे, उपाध्यक्ष नरेश दामोदर कांबळे आणि सचिव हेमंत शशिकांत पाठक यांनी केले आहे.
उपक्रमाबाबत अधिक माहितीसाठी नरेश कांबळे (९४२२५६५५४८), डॉ. अनिल वाणी (८२०८५४०५२३), डॉ. राजेंद्र सोनार (८२२६७६६०८४), तुळशीराम भदाणे (८२०८०७००४०), हेमंत पाठक (९४२२२७७९८२) आणि गौरव चौधरी (८४२११७२१९४) यांच्याशी संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed