अमळनेर तालुका बीएलओ न्याय हक्क समितीची बैठक संपन्न AIROच्या धर्तीवर बीएलओंनाही योग्य मानधन देण्याची मागणी; मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा.

0

अमळनेर  | आबिद शेख.   

                                       निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरावलोकन (SIR) कामात बीएलओ अत्यंत प्रामाणिकपणे आपली जबाबदारी पार पाडत आहेत. मात्र, नियमित कामासोबतच अतिरिक्त कामाचा वाढता बोजा आणि सततच्या कामाच्या दबावामुळे बीएलओंवर मोठ्या प्रमाणात मानसिक व शारीरिक ताण निर्माण होत असल्याची भावना बैठकीत व्यक्त करण्यात आली.


या पार्श्वभूमीवर बीएलओंच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी अमळनेर तालुका बीएलओ न्याय हक्क समितीची बैठक १६ ऑगस्ट रोजी टाऊन हॉल येथे घेण्यात आली. बैठकीत बीएलओंना त्यांच्या कामाच्या तुलनेत योग्य मानधन मिळावे, ही प्रमुख मागणी करण्यात आली. तसेच AIRO यांना अनुक्रमे ३० हजार व २५ हजार रुपये मानधन मंजूर झाले असल्याने बीएलओंनाही त्याच धर्तीवर योग्य मानधन देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली.


बीएलओंवर सोपविण्यात येणारी अतिरिक्त कामे, कामाचा वाढता ताण, वेळेची मर्यादा आणि कामाच्या स्वरूपाच्या तुलनेत मिळणारे मानधन याबाबतही बैठकीत सविस्तर चर्चा झाली. बीएलओंच्या न्याय मागण्यांसाठी संघटितपणे पाठपुरावा करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
या बैठकीस भगवान एकनाथ पाटील, डॉ. कुणाल मुरलीधर पवार, अजय भगवान भामरे, हेमंत बाबूलाल महाजन, रामेश्वर भदाणे,ज्ञानेश्वर तुकाराम गंधालीकर, रमेश केशवराव पाटील, अशोक पंडित जाधव, दीपककुमार वसंतराव पाटील, सर्जेराव एकनाथ पाटील, जयवंत भीमराव पाटील, गोविंदा बळीराम माळी, सोमनाथ शांताराम विसपुते, प्रसाद प्रभाकर जोशी, भूषण सुरेश महाले, प्रदीप सुखदेव पाटील, सोपान शिवाजी मोरे, विकास गोपीचंद पाटील, सुनील विठ्ठल मराठी, सागर आधार महाजन, विशाल संजय साळुंखे, सतीश सुखदेव बडगुजर, रईस अहमद शेख अब्दुल्ला, रमेश सोनप्पा मंगसुळे, सुधीर अनिल पाटील, किशोर डी. चौधरी, जगदीश भास्करराव पाटील, अर्जुन रामजी वसावे, दीपक गुलाब पाटील, भटेश्वर नानाभाऊ भदाणे, राजेंद्र दयाराम पाटील, धीरज रतिलाल कोटवाल, महेंद्र अर्जुन रत्नपारखी, जितेंद्र वसंत वाणी, प्रफुल्ल शरद भदाणे, भूपेंद्र बळीराम वानखेडे, विकास सुंदरलाल चौधरी, जगदीश शिवाजी पाटील, अतुल राजाराम भोई, उज्वल अशोक मार्कंडेय, मकरंद रमेश निळे, किरण सुरेश ठाकूर, गुलाब सखाराम बोरसे, धर्मा गुलाब धनगर, भरत रामदास पाटील, गिरीश युवराज पाटील, स्वप्निल यशवंत पाटील, एस. व्ही. पाटील , ज्ञानेश्वर मोरे यांसह अन्य बीएलओ उपस्थित होते. या सहविचार सभेमध्ये मंजूर करण्यात आलेल्या ठरावांना तालुक्यातील सर्व बीएलओ कर्मचाऱ्यांनी पाठिंबा दर्शविला आहे. वेळप्रसंगी मागण्यांसाठी आंदोलन छेडण्यात येईल असा सुर सगळ्या बिएलओ वर्गातून निघत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed