SIR मोहिमेची अमळनेरात सुरुवात; प्रांताधिकाऱ्यांकडून BLO कामकाजाची प्रत्यक्ष पाहणी.

0

आबिद शेख/अमळनेर 

अमळनेर -मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) मोहिमेला ३० जूनपासून सुरुवात झाली असून ही मोहीम २९ जुलैपर्यंत राबविण्यात येणार आहे. मोहिमेच्या प्रारंभीच अमळनेरचे मतदार नोंदणी अधिकारी तथा प्रांताधिकारी मयूर भंगाळे यांनी क्षेत्रभेट देत प्रत्यक्ष कामकाजाचा आढावा घेतला.


या पाहणीदरम्यान संबंधित BLO प्रत्यक्ष क्षेत्रात जाऊन मतदारांकडून गणना प्रपत्र भरून घेत आहेत का, कामकाजाची गती आणि अचूकता कशी आहे तसेच अंमलबजावणीत काही अडचणी येत आहेत का, याची माहिती त्यांनी घेतली. यावेळी उद्भवणाऱ्या अडचणींवर आवश्यक सूचना व मार्गदर्शन करून मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
क्षेत्रभेटीदरम्यान भाग क्रमांक १६९ चे BLO तथा शिक्षक अजय भामरे यांच्या कामाची अचानक तपासणी करण्यात आली. यावेळी प्रांताधिकाऱ्यांनी मतदार प्रा. अशोक पवार यांच्या निवासस्थानी भेट देत गणना प्रपत्र भरण्याच्या प्रक्रियेची प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच भरलेल्या प्रपत्राची प्रत संबंधित मतदारांना देण्यात आली.
या पाहणीनंतर BLO यांच्या कामाबाबत समाधान व्यक्त करण्यात आले असून मतदारांना वेळेत आणि अचूक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी अधिक दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed